Latest

Google Maps : नव्या वर्षात ‘गुगल मॅप्स’मध्ये नवे बदल; ‘हे’ आहेत नवे फीचर

Arun Patil

नवी दिल्ली : 'गुगल मॅप' (Google Maps) हे आता जगभरातील लोकांचा विश्वासू वाटाड्या बनलेले आहेत. अनोळखी ठिकाणाबाबत 'मार्ग'दर्शन करणारे हे अ‍ॅप नवीन वर्षात नव्या वैशिष्ट्यांसह भारतीयांच्या भेटीस येणार आहे. फ्युएल एफिशियंट रुटिंग हे त्याचे सर्वाधिक उपयुक्त साधन ठरेल. म्हणजे याद्वारे कमी इंधन लागणारा मार्ग दाखवला जाईल. त्यात सर्वात लहान मार्गाचा अंदाज नसेल. उलट कार, दुचाकी इंजिनातील अनेक प्रकार, रस्ते, उतार, रेड लाइट व ट्रॅफिक पॅटर्ननुसार हे अ‍ॅप माहिती देईल. कोणत्या मार्गाने गेल्यास पेट्रोल कमी लागेल, हे यावरून समजेल. गुगल मॅप्स (Google Maps) अ‍ॅपच्या उपाध्यक्ष मरियम डेनियल म्हणाल्या, आतापर्यंत कोणत्या मार्गाने गेल्यास वेळेची बचत होईल एवढीच माहिती मिळत होती. नव्या फीचरमुळे प्रवास अधिक सुलभ होईल.

Google Maps : हे आहेत नवे फीचर 

अ‍ॅड्रेस डेस्क्रिप्टर : आतापर्यंत लोकेशन शेअर केल्यावर अक्षांश व देशांतरानुसार पत्ता समजून घेता येतो. आता लोकेशन शेअर केल्यानतंर जवळपासचे 5-6 लँडमार्गसह नेव्हिगेशनही उपलब्ध होईल. उदाहरणार्थ- एसबीआयच्या एटीएमपासून डाव्या बाजूस वळावे. नंतर ई-व्हेईकल शोरूमच्या पुढे पिंपळाच्या झाडासमोर उजव्या बाजूच्या गल्लीत वळावे. तुमच्या डाव्या बाजूस उद्यान व ओपन जिम आहे. ते ओलांडताच पहिल्या इमारतीत तुमचा पत्ता आहे. नवीन वर्षापासून देशातील 75 शहरांत गुगल मॅप्सवर या फीचरच्या वापरास सुरुवात होईल, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

लेन्स इन मॅप्स : हे फीचर दिल्लीसह 15 शहरांत जानेवारीत सुरू होईल. युजरने एखाद्या मार्गाचे द़ृश्य लेन्सने कॅप्चर करताच त्याचे मागे-पुढे, आजूबाजूला कोण-कोणती ठिकाणे आहेत याची माहिती मिळेल.

लाइव्ह वॉकिंग नेव्हिगेशन : याद्वारे ईप्सितस्थळी पायी जाण्यासाठी असलेला स्ट्रीट व्ह्यूसोबत अ‍ॅरो, दिशा व अंतराचा मार्कर असेल. एखाद्या ठिकाणी वळण्याऐवजी पुढे गेल्यास फोन व्हायब्रेट होऊन मागेच वळायचे होते, असा इशारा करेल.
3 हजार शहरांत ती सेवा सुरू होईल.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT