Latest

बाबर रोडचे नाव बदलण्याची मागणी; ‘अयोध्या मार्ग’ स्टिकर लावल्याने तापले वातावरण

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशाची राजधानी दिल्लीत आता आणखी एका मार्गाचे नाव बदलण्याची मागणी होत आहे. रिपोर्टनुसार, हिंदू सेना कार्यकर्त्यांनी बाबर रोडच्या फलकावर अयोध्या मार्ग असे नाव असलेले स्टिकर चिटकवले. हा देश रामाचे आहे तर बाबर रोडचे नावदेखील बदललं गेलं पाहिजे, असे हिंदू सेनेचे म्हणणे आहे. शनिवार सकाळी बाबर रोडच्या फलकावर अयोध्या मार्ग सिटेकर लावण्यात आले आहे.

संबंधित बातम्या –

हिंदू सेना बाबर रोडचे नाव बदलण्याची मागणी दीर्घकाळापासून करत असल्याचे म्हटले जात आहे. त्यांचे म्हणणे आहे की, या रोडच नाव देखील बदलले गेले पाहिजे. हिंदू सेनेचे म्हणणे आहे की, भारत देश महापुरुष जसे- भगवान राम, भगवान कृष्ण, वाल्मीकि आणि गुरु रविदा यांचा देश आहे.

हिंदू सेनेचे म्हणणे आहे की, अयोध्यामध्ये भगवान रामाचे मंदिर तयार होत आहे. जेव्हा बाबरची बाबरी राहिली नाही तर दिल्लीमध्ये बाबर रोडचे काय काम?

काय म्हणाले एनडीएमसी अधिकारी?

या संपूर्ण प्रकरणात नवी दिल्ली म्युनिसिपल कॉर्पोरेशन (एनडीएमएसी) च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ते हे पोस्टर हटवतील आणि तक्रारदेखील दाखल करतील.

SCROLL FOR NEXT