Latest

Netherland: नेदरलँडमध्ये दोन रेल्वेची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू; 30 जण जखमी

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : दक्षिण नेदरलँडमध्ये मालवाहतूक रेल्वे आणि प्रवासी रेल्वे यांची समोरासमोर धडक झाल्याने मोठी दुर्घटना घडली. या दोन्ही रेल्वे गाड्या एकमेकांना धडकल्याने आग लागून रेल्वे रूळावरून घसरल्याची घटना घडली. या दुर्घटनेत एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे तर, ३० जण जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ स्थानिकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती येथील आपत्ती व्यवस्थापने दिली आहे.

ही घटना आज (दि.०४) पहाटे ३ वाजून ३० मिनिटांनी दक्षिण नेदरलँडमधील हेग आणि अॅमस्टरडॅम दरम्यान वूरशोटेन गावात घडली. धडक झालेल्या आणि रूळावरून घसरलेल्या प्रवासी रेल्वेत ५० प्रवासी होते, त्यातील काहीजण गंभीर जखमी झाल्याची माहिती येथील स्थानिक माध्यमांनी दिली आहे.

एएनपी वृत्तसंस्थेने सांगितले की, लीडेन शहरापासून हेगकडे जाणार्‍या रात्रीच्या रेल्वेचा पुढचा डबा रुळावरून घसरला आणि तो शेजारी शेतात जाऊन पडला. समोरून येणारी दुसरी रेल्वे मागे दाबली गेली त्यामुळे त्याच्या दोन नंबरच्या डब्याला आग लागली. पण आपत्कालीन विभागाच्या सतर्कतेमुळे आग आटोक्यात आणण्यात येथील आपत्ती व्यवस्थापनाला यश आले, असे म्हटले आहे. डच रेल्वे (NS) ने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, या अपघातामुळे लेडेन आणि हेगच्या काही भागांदरम्यानच्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT