Latest

Nepal Aircraft Crash: नेपाळ विमान दुर्घटना; मृतांचा आकडा ६८ वर

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Nepal Aircraft Crash : नेपाळ विमान दुर्घटनेतील मृतांचा आकडा ६८ वर गेला असल्याची माहिती एएनआयने नेपाळ नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाच्या हवाल्याने दिली आहे.  या विमानात एकूण ६८ प्रवाशांसह ४ क्र्यू मेंबर होते. प्रवाशांमध्ये १० विदेशी नागरिक होते, अशी माहिती नेपाळच्या सरकारी वृत्त वाहिनीने दिली आहे. तर या विमानात ५ भारतीयांचा समावेश असल्याची माहितीही संबंधित प्राधिकरणाने दिली आहे.


नेपाळमधील पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर 72 आसनी प्रवासी विमान धावपट्टीवर कोसळले आहे. ही घटना सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. दरम्यान तत्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. घटनेमुळे सध्या विमानतळ बंद आहे. दरम्यान आतापर्यंत ६८ मृतदेह सापडले असल्याची माहिती नेपाळच्या माध्यमांनी दिली आहे.

Nepal Aircraft Crash : अपघाताबाबत माहिती देताना यति एअरलाइन्सचे प्रवक्ते सुदर्शन बर्तौला यांनी सांगितले की, जुने विमानतळ आणि पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान कोसळलेल्या विमानात एकूण 68 प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते. नेपाळच्या सरकारी वृत्त वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार यामध्ये 10 विदेशी नागरिक होते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलेल्या चित्रे आणि व्हिडिओंमध्ये अपघातस्थळावरून धुराचे लोट उठताना दिसत आहेत. अपघातस्थळी हेलिकॉप्टरद्वारे बचाव पथक तैनात करण्यात आले आहे.

नेपाळच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाने (CAAN) दिलेल्या माहितीनुसार, विमानाने काठमांडू येथून सकाळी 10:33 वाजता उड्डाण केले. विमान पोखरा विमानतळावर लँडिंगच्या अगदी जवळ असताना सेती नदीच्या काठावर कोसळले. उड्डाणानंतर सुमारे 20 मिनिटांनी हा अपघात झाला, असे सूचित केले जात आहे की विमान खाली उतरत असावे. दोन शहरांमधील फ्लाइटची वेळ 25 मिनिटे आहे.

यती एअरलाइन्सने चालवलेले ट्विन-इंजिन एटीआर 72 विमान नेपाळची राजधानी काठमांडू येथून जात होते, असे एका अधिकाऱ्याने वृत्तसंस्था रॉयटर्सला सांगितले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलेली चित्रे आणि व्हिडिओमध्ये अपघातस्थळावरून धुराचे लोट उठताना दिसत आहेत. भग्नावशेषाला आग लागल्याने बचाव कार्य कठीण झाले होते. नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल 'प्रचंड' यांनी मंत्रिमंडळाची आपत्कालीन बैठक बोलावली आहे, अशी माहिती नेपाळी पत्रकार दिलीप थापा यांनी एनडीटीव्हीला दिली.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT