Latest

Tiktok App Banned : भारतानंतर आता नेपाळमध्येही ‘टिकटॉक’वर बंदी, जाणून घ्‍या कारण

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतानंतर आता नेपाळ सरकारने चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिकटॉकवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. आज (दि. १३) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नेपाळ सरकारने टिकटॉकवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. दूरसंचार मंत्री रेखा शर्मा यांनी टिकटॉकवर लवकरच बंदी घातली जाणार, अशी माहिती दिली;  परंतु सध्या यासाठी कोणतीही कालमर्यादा निश्चित केलेली नाही. (Tiktok App Banned)

'काठमांडू पोस्ट'ने दिलेल्या वृत्तानुसार, नेपाळ सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीत टिकटॉकवरील वाढत्या सायबर गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर नेपाळ सरकारने हे पाऊल उचलण्याचे ठरवले. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा मूलभूत अधिकार आहे; परंतु या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर समाजातील मोठ्या वर्गांमध्ये द्वेषयुक्त भाषणाच्या वाढत्या प्रवृत्तीला प्रोत्साहन देण्याऱ्यांना आळा घालण्यात मोठा परिणाम होईल असे नेपाळ सरकारकडून सांगण्यात आले. (Tiktok App Banned)

नेपाळमधील स्थानिक वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, नेपाळमध्ये टिकटॉकवर गेल्या चार वर्षांत सायबर गुन्ह्यांची 1647 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. अशा परिस्थितीत देशातील सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सरकारने इतका कठोर निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT