पुढारी ऑनलाईन डेस्क : मी शिवसेनेमध्ये २५ वर्षाहून अधिक कार्यरत आहे. मात्र मागील दाेन ते तीन वर्षे आपण शिवसेनेतील मुख्य प्रवाहापासून लांब जात आहोत असे वाटत हाेतं. संवाद एकतर्फी हाेत असल्याचे जाणवले. महत्वाच्या बैठकांना निमंत्रण दिलं जात नव्हतं. पक्षातील काही नेत्यांना माझी उपस्थिती खटकत असावी. यामुळे मला डावलले जात होते. मातोश्रीवरील बैठकांना मी उपस्थित नसावं अशी काहींची इच्छा होती. ठाकरे गटातील संवादचं संपुष्टात आल्याने ठाकरे गट सोडला, अशा शब्दांमध्ये ज्येष्ठ नेत्या नीलम गोऱ्हे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. बाळासाहेबांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे, आम्ही आजही शिवसेनेत आहाेत, असेही त्यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना स्पष्ट केले. (Neelam Gorhe)
या वेळी नीलम गोऱ्हे म्हणाल्या, कार्यकर्ते आणि उद्धव ठाकरे गटात संवाद नव्हता. कार्यकर्त्यांच्या अपेक्षा ठाकरे गटाकडून पूर्ण हाेत नव्हत्या. त्यामुळे कार्यकर्त्यांचे धैर्य खचत चाललं आहे. शिवसेना शिंदे गटात केलेल्या पक्षप्रवेशासंदर्भात बोलताना त्या म्हणाल्या की, "एका दिवसामध्ये पक्ष बदल होत नाही. त्यामागे नक्की एक कारण नसतं. त्या मागे अनेक कारणे आहेत. कुठेतरी जाणवलं की, संपूर्ण संवाद हा एकतर्फी होता. माझ्या काही प्रश्नांची उत्तर मिळत नव्हती. प्रश्न घेवून जायचो; पण उत्तर मिळत नव्हती. महत्त्वाच्या निर्णयांच्या वेळी मी नव्हतेचं. कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाताना विचारलं नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
आई गेल्यावर सर्वप्रथम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घरी भेटायला आले. त्यानंतर देवेंद्र फडणवीसही आले. उद्धव टाकरे यांनी केवळ मला फोन केला. उद्धव ठाकरे यांच्या आजारानंतर पक्षातील चर्चेची सर्वच दरवाजे बंद झाली. माझी काम हाणून पाडण्याचा प्रयत्न काही लोकांकडून होत होता. हुशार माणसांना ठाकरेंकडून डावलले जातं, असा आराेप करत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर निशाणा साधताना गोऱ्हे म्हणाल्या, " एखाद्या महिलेच्या एन्ट्रीने मला फरक पडत नाही."
संजय राऊत यांनी मला अडचणीच्या काळात मदत केली आहे. पक्षाचा प्रवक्ता हा पक्षाने सांगितलेलं बोललं असतो. त्यामुळे ते बोलत असतात. संजय राऊत यांना मागील काही दिवसांत खूप त्रास झाला आहे. त्यांचा बळी गेला आहे; पण त्यांनी आक्रमक होण्याची काय गरज आहे. त्यांनी एखादा मुद्दा मुद्देसुद मांडण्यात काय वावग आहे, असा सवालही त्यांनी केला.
ठाकरे गटातील नेत्यांबद्दल मला आदर आहे. एकनाथ शिंदे कार्यशील नेते. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते बाहेर पडले. यावर पक्षातील नेत्यांनी विचार कारयला हवा. माझ्या निर्णय प्रक्रियेत फडणवीस यांचा हात नाही. शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याच कोणाला सांगितल नव्हतं.असेही गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा