Latest

Chandrakant Patil : राजकारणात सगळ्यांची भाषा बदलली, आचारसंहिता ठरविण्याची गरज: चंद्रकांत पाटील

अविनाश सुतार
अमरावती, पुढारी वृत्तसेवा: राजकारणात कोणी कोणाला काहीही बोलत आहे. कोणी कोणाला बेडूक म्हणतो, तर कोणी साप म्हणतो. सगळे प्राणी एकदम राजकारणात आणून टाकले जात आहेत, महाराष्ट्राच्या राजकारणात सगळ्यांची भाषा बदलली आहे. एकदा सगळ्या पक्षांनी एकत्र बसून आचारसंहिता ठरविली पाहिजे, असे मत अमरावतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. Chandrakant Patil
वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर केलेल्या टीकेसंदर्भात त्यांना प्रसार माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर ते आज (दि.९) प्रतिक्रिया देत होते. Chandrakant Patil
दरम्यान, अमरावती लोकसभेच्या जागेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर चंद्रकांत पाटील यांनी सोडविणारे नक्की सोडवितील, असे स्पष्ट केले. या देशातील लोकशाही जगातील सर्वात प्रस्थापित झालेली लोकशाही आहे. अशा लोकशाहीमध्ये लोकसभेकरिता त्या- त्या पक्षाला उमेदवार ठरवायला, कोणाला कुठली जागा द्यायची, चिन्ह कुठले द्यायचे, हे ठरवायला वेळ लागतो. त्याची प्रक्रिया प्रत्येक पक्षाला नीट माहित आहे. योग्य दिशेने गाडी चालली आहे. त्या- त्या पक्षांच्या नेत्यांना कधी मूठ उघडायची, हे चांगले माहित आहे. त्यामुळे ते मूठ उघडतील, असेही ते म्हणाले.
हेही वाचा 
SCROLL FOR NEXT