Latest

Sharad Pawar : इंडिया आघाडीच्या बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शरद पवार उपस्थित

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज (दि.१३) इंडिया आघाडीच्या बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटप, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली रविवारीपासून (दि. १४) सुरू होत असलेल्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होणे आणि इतर मुद्द्यांचा आढावा घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. Sharad Pawar

दिल्ली येथे शनिवारी (दि. १३) मलिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली इंडिया आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीला सोनिया गांधी, राहुल गांधी आदींसह इंडिया आघाडीचे सर्वच नेते उपस्थित होते.  Sharad Pawar

विघ्नहर कारखान्यावर कार्यक्रम असल्यामुळे मी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या बैठकीमध्ये सहभागी झाल्याचे खा. पवार यांनी सांगितले. इंडिया आघाडीचे प्रमुखपद मल्लिकार्जुन खर्गे यांनी घ्यावे तसेच आपण सगळ्यांनी एका विचाराने लोकसभा निवडणुकीला सामोरे जावे अशी चर्चा या बैठकीमध्ये झाल्याचे सांगत इंडिया आघाडी लोकसभा निवडणुकी संदर्भात जागा वाटपाचा निर्णय लवकरात लवकर घेणार आहे. ज्या ठिकाणी वाद असेल त्या ठिकाणी एक-दोन लोकांनी एकत्र बसून मार्ग काढावा, असे या बैठकीमध्ये ठरल्याचे खा. पवार यांनी सांगितले.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT