Latest

NCERT : एनसीआरटीने १० वीच्या पुस्तकातून राजकीय पक्ष, लोकशाहीतील आव्हाने अशी प्रकरणे वगळली

अमृता चौगुले

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : एनसीईआरटीने (NCERT) इयत्ता १० वीच्या पाठ्यपुस्तकांमधून राजकीय पक्ष आणि लोकशाहीसमोरील आव्हाने यावरील प्रकरणे हटवून नव्या वादाला तोंड फोडले आहे. नवीन पाठ्यपुस्तकांमधून वगळलेली तीन उल्लेखनीय प्रकरणे म्हणजे लोकशाही आणि विविधता, राजकीय पक्ष आणि लोकशाहीसमोरील आव्हाने. नुकतेच एनसीआरटीने इयत्ता १०वीच्या विज्ञानाच्या पुस्तकांमधून आवर्त सारणी (Periodic Table) काढून टाकला होता. यावरील वादाचा धुरळा खाली बसतो न बसतो तोच इतर महत्त्वाची प्रकरणे सुद्धा वगळल्याची बाब समोर आली आहे. (NCERT)

नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (एनसीईआरटी)ने कोरानाच्या काळातील अभ्यासक्रमात या अभ्यासक्रमांना तात्पुरत्या स्वरुपात हटवले होते. पण, आता एनसीआरटीने ही प्रकरणे कायमस्वरुपी अभ्यासक्रमातून काढून टाकली आहे. शास्त्रज्ञ आणि शिक्षकांनी इयत्ता १० वीच्या अभ्यासक्रमातून महत्त्वाचे पाठ हटवल्याच्या दीर्घकालीन परिणामाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. (NCERT)

एप्रिलमध्ये सरकारी संस्थेने ९ वी आणि १० वीच्या विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकांमधून चार्ल्स डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत काढून टाकण्याचा निर्णय घेतला. महात्मा गांधी यांच्या हत्येचे संदर्भ आणि स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांना इयत्ता ११ वीच्या राज्यशास्त्राच्या पाठ्यपुस्तकांमधून वगळण्यात आले. त्यानंतर NCERT अनेक वादांच्या भोवऱ्यात सापडले आहे. याशिवाय एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांमधून मुघल इतिहासाचे संदर्भही विविध पातळ्यांवर कापले गेले आहेत. (NCERT)

नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च (NCERT) ने इयत्ता १० वीच्या विज्ञानाच्या पुस्तकातून आवर्त सारणी काढून टाकण्याचा निर्णय घेतला आणि पुन्हा एकदा एनसीईआरटीच्या निर्णयावर गदारोळ सुरु झाला आहे. यासाठी एनसीईआरटीने विद्यार्थ्यांवरील ओझे दूर करण्यासाठी हा असा निर्णय घेतल्याचा युक्तिवाद केला आहे. विशेष म्हणजे या वर्षी परिषदेने विज्ञानाच्या पुस्तकातून 'थिअरी ऑफ इव्होल्यूशन' अर्थात डार्विनचा सिद्धांत (Theory of Evolution) काढून टाकले होते. त्यानंतरही बराच गदारोळ झाला. आता राजकीय पक्ष, लोकशाही समोरी आव्हाने सारखी सामजिक शास्त्रातील प्रकरणे काढून एनसीआरटीने पुन्हा गोंधळ तर घातलाच आहे पण, स्वत:वर टीकेची झोड उठवून घेतली आहे.


अधिक वाचा :

SCROLL FOR NEXT