Latest

Kiran Gosavi : किरण गोसावीच्या पोलिस कोठडीत वाढ

रणजित गायकवाड

क्रूझवरील अमली पदार्थ प्रकरणात पंच असलेला व फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या किरण गोसावी ( Kiran Gosavi ) याने फरार कालावधीत सचिन पाटील नावाने बनावट आधारकार्ड बनवून घेतले होते. तसेच, त्याला त्याच्या फेसबुक व ई मेलचा पासवर्ड आठवत नसल्याची माहिती सरकारी वकील वर्षा असलेकर यांनी न्यायालयाला दिली. गुन्हयाच्या अधिक तपासासाठी त्याच्या पोलिस कोठडीत तीन दिवस वाढ करण्याची मागणी सरकारी वकीलांनी केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर.. के. बाफना-भळगट यांनी ती मान्य करत गोसावी याच्या कोठडीत एक दिवसांची वाढ केली आहे.

मेट्रोपोल हॉटेल मलेशिया या ठिकाणी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेगवेगळ्या कारणांसाठी 3 लाख 9 हजार 395 रुपये स्वीकारल्याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या गोसावीच्या पोलिस कोठडीची मुदत संपत आल्याने सोमवारी (दि. 8) त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी, गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी त्याच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकील वर्षा असलेकर यांनी केली.

न्यायालयाने ती मान्य करत त्याच्या पोलिस कोठडीत वाढ केली. परदेशात नोकरी लावून देण्याच्या आमिषाने तीन लाख नऊ हजार रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी चिन्मय श्रीधर देशमुख (वय 22, रा. कसबा पेठ) यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या गुन्ह्यात यापूर्वी शेरबानो महम्मद इरफान कुरेशी (वय 27, रा. मुंबई) हिला यापूर्वी अटक करण्यात आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT