Latest

छत्तीसगडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी नक्षलवादी हल्ला, हेड कॉन्स्टेबल शहीद

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यात रविवारी (दि.२६) नक्षलवाद्यांनी पेरलेल्या प्रेशर इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईसचा (आयईडी) स्फोट झाला. या स्फोटात एक हेड कॉन्स्टेबल शहिद झाल्याची माहिती नारायणपूरचे एसपी पुष्कर शर्मा यांनी दिली आहे.

सकाळी ७ वाजता स्फोट

नारायणपूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक हेमसागर सिदार यांनी सांगितले की, ही घटना ओरछा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बटूम गावाजवळ रविवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. या भागात नक्षल बॅनर लावल्याची माहिती मिळाल्यानंतर सीएएफच्या पथकाने राज्याची राजधानी रायपूरपासून सुमारे 300 किमी अंतरावर असलेल्या ओरछा पोलिस स्टेशनपासून गस्त सुरू केली होती, असे त्यांनी सांगितले.

२५ फेब्रुवारीच्या हल्ल्यात तीन जवान शहीद

यापूर्वी, २५ फेब्रुवारी रोजी सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत जिल्हा राखीव दलाचे तीन जवान शहीद झाले होते, तर दोन जवान जखमी झाले होते. जगरगुंडाजवळील आश्रम पारा येथे २५ फेब्रुवारीच्या सकाळी ही चकमक झाली. जवान शोध मोहिमेवर निघाले असताना, दरम्यान वेगवान गोळीबार झाल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी २० फेब्रुवारीला राजनांदगाव येथे नक्षलवादी हल्ल्यात दोन पोलिस शहीद झाले होते.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT