Latest

Sameer Wankhede : नवाब मलिकांनी व्हायरल केले व्हॉट्स ॲप चॅट

backup backup

मुंबई येथे एनसीबीने छापा टाकल्यानंतर प्रकाशझोतात आलेल्या समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्याविषयीचे व्हॉट्स ॲप चॅट अल्पसंख्याक मदत मंत्री नवाब मलिक यांनी व्हायरल केले आहे. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून त्यांनी हे चॅट व्हायरल केले असून हे चॅट के. पी. गोसावी आणि खबऱ्यातील आहेत. लोकांना कसे अडकवायचे याचे संभाषण त्यात आहे.

हे चॅट व्हायरल करताना ही समीर दाऊद वानखेडेंची खासगी सेना आहे. त्यांना उत्तर द्यावे लागेल असेही मलिक यांनी लिहिले आहे.
कार्डेलिया क्रूजवर एनसीबीने छापा टाकल्यानंतर अभिनेता शाहरूख खान यांचा मुलगा आर्यन खान याच्यासह अन्य संशयितांना अटक केली होती. त्यानंतर या छाप्यावर संशय व्यक्त करत नवाब मलिक यांनी अनेक दावे केले होते.

वानखेडे यांनी भाजप कार्यकर्ते आणि काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना हाताशी धरून ही कारवाई केली होती, असा आरोप करत काही पुरावे सादर केले. तसेच वानखेडे यांच्या कौटुंबीक पातळीवरील काही बाबी उघड करून त्यांच्या जात प्रमाणपत्रावरही आक्षेप नोंदवला होता. यानंतर वानखेडे यांच्याकडून आर्यन खान प्रकरणासह अन्य प्रकरणांचा तपास काढून घेण्यात आला. त्यानंतर या प्रकरणात भाजपने उडी घेतली. मात्र, नवाब मलिक यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. त्यानंतर भाजपचे हल्ले बंद झाले.

हे प्रकरण शमले असे वाटत असताना आज नवाब मलिक यांनी एका व्हॉट्सॲप चॅटचा स्क्रीनशॉट ट्वीट केला आहे.

के. पी गोसावी याच्यासोबत झालेल्या संभाषणात खबऱ्याने काशिफ खानच्या नावाचा उल्लेख केला आहे. असे असतानाही खानची चौकशी का नाही असा सवाल उपस्थित केला आहे. काशिफ खान आणि (Sameer Wankhede) चॅट प्रकरणात काय संबंध आहेत?, असंही त्यांनी म्हटलं आहे. ही समीर दाऊद वानखेडे यांची खासगी सेना आहे, त्यांना उत्तर द्यावे लागेल असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT