Latest

Nawab Malik Arrest : मलिकांच्या अटकेनंतर क्रांति रेडकरचे ट्वीट चर्चेत

अमृता चौगुले

मुंबई; पुढारी ऑनलाईन : दाऊद इब्राहिम मनी लॉन्ड्रींग प्रकरणी ( Nawab Malik Arrest ) बुधवारी (दि. २३) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तसेच राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. ईडीने त्यांना पहाटे ताब्यात घेत सुमारे आठ तासांहून अधिककाळ कसून चौकशी केली व त्यानंतर मलिक यांना अटक करण्यात आले. मलिक यांच्या अटकेनंतर मराठी सिनेअभिनेत्री क्रांति रेडकर हिने ट्वीट केले आहे. या ट्वीटची चांगलीच चर्चा सुरु आहे.

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने केलेल्या कारवाई नंतर आर्यन खानच्या बचावासाठी मंत्री नवाब मलिक ( Nawab Malik Arrest ) पुढे येत ही कारवाई बोगस असून एनसीबीचे तत्कालीन अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर मलिक यांनी आरोप केला होता. शिवाय या प्रकरणी नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या कुटुंबाशी संबधित अनेक खुलासे केले होते. त्यावेळी समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांति रेडकर हिचे मंत्री नवाब मलिक यांच्याशी अनेक वेळा जुंपले होते. हे सर्वश्रुत आहे.

मनी लॉन्ड्रींग प्रकरणात नवाब मलिकांना ( Nawab Malik Arrest ) अटक झाल्यानंतर क्रांति रेडकर हिने एक गाणे ट्वीट केले आहे. या ट्वीट मध्ये तिने माझे आवडते गीत जय माय भवानी… आपल्या सर्वांना आजचा दिवस शुभ जावो असे पोस्ट करत तिने अजय देवगन याचे तान्हाजी चित्रपटातील माय भवानी हे गाणे ट्वीट केले आहे. या ट्वीट मध्ये माय भवानी गीताचा अठ्ठावीस सेंकदाचा व्हिडिओ आहे. त्या गीतातील ओळी अशा आहेत.

सा-रा-रा होलिका जले, शत्रू राख मे मिले,

हमने जबजब समशिरे तनी है, माय भवानी

सन-न-न-आंधिया उठे, शत्रू जड से मिठे

हमने बात यही मन में ठानी है माय ऐ भवानी

नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर क्रांति रेडकर हिने केलेल्या ट्वीटची सर्वत्र चांगलीच चर्चा होत आहे. या ट्वीटवर अनेकजण तिला प्रतिक्रीया देखिल देत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT