Latest

नवले पूल नव्हे ! हा तर अपघात पूल ; अपघातात दुचाकीस्वार ठार 

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : नवले पूल अलीकडे सतत अपघातांच्या बातम्यामुळे गाजतो आहे. नवले पुलावर सिग्नलला थांबलेल्या तीन कार आणि एका दुचाकीला भरधाव वेगाने पाठीमागून आलेल्या ट्रकने जोरात धडक दिली. त्यामध्ये एका दुचाकी चालकाचा मृत्यू झाल्याचे समजते. संदेश खेडेकर ( ३४ वर्षे ) रा. इस्कॉन टेम्पल जवळ, टिळेकर नगर, कात्रज कोंढवा रोड,) असे त्याचे नाव आहे. या अपघातात एक महिला देखील जखमी झाल्याचं समोर येत आहे.

अपघातांचे सत्र थांबेना ! 

नवले पुलावरील अपघाताचे सत्र काही थांबताना दिसून येत नाही. पाचसहा दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आज परत अपघात झाला आहे. अनेकदा उपायोजना अपघात रोखण्यासाठी करण्यात आल्या. मात्र अपघात काही थांबताना दिसून येत नाहीत.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT