Latest

नवज्योत सिंग सिद्धू क्रुर व्यक्ती, पैशासाठी वडिलांच्या मृत्यूनंतर आईला सोडले ! बहिणीचा आरोप

backup backup

पंजाब; पुढारी वृत्तसेवा

पंजाब काँग्रेस अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर त्यांच्या बहिणेनं गंभीर आरोप केले आहेत. सिद्धू मोठी बहिण सुमन तूर यांनी पैशासाठी आपल्या वयोवृद्ध आईला सोडले असल्याचा आरोप केला आहे. अमेरिकेत राहत असलेल्या सुमन तूर यांनी नवजोत सिंह हे क्रुर असल्याचे म्हटले आहे. सुमन तूर यांनी आरोप केला आहे की १९८६ मध्ये सिंधूच्या वडिलांच्या मृत्यूनंतर सिद्धूंनी आपल्या आईला सोडून दिले आणि नंतर १९८९ साली दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवर निराधार महिलेच्या रुपाने त्यांच्या आईचा मृत्यू झाला.

सुमन तूर सध्या चंडीगडमध्ये आहेत. चंडीगडमध्ये एका संवाद संमेलनात बोलत असताना त्यांनी आरोप केले आहेत की सिद्धू यांनी १९८६ मध्ये आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर सिद्धूंनी आपल्या आईला घरातून बाहेर काढले. तूर यांनी दावा केला की त्यांची आई १९८९ त्यांच्या आईचा मृत्यू झाला. आम्ही फार कठीण काळ पाहिला आहे. माझी आई चार महिने हॉस्पिटलमध्ये होती. मी जे दावे करत आहे त्याचे कागदपत्र ,पुरावे माझ्याकडे आहेत. सिद्धू यांनी संपत्तीसाठी आईशी नाते तोडले होते.

माझ्या वडिलांनी पेन्शन शिवाय घर आणि जमिन सोबतचं काही संपत्तीही सिद्धूंसाठी ठेवली होती. सुमन पुढे बोलताना म्हणाल्या की, सिद्धूने पैशासाठी आमच्या आईला सोडले. आम्हाला सिद्धंकडून काही नको आहे. सिद्धू हे क्रूर व्यक्ती आहेत. सुमन यांनी दावा केला आहे की मी १९८७ मध्ये सिद्धूंनी इंडिया टुडेला मुलाखत दिली होती. त्यामध्ये त्यांनी आपल्या आई-वडिलांपासून वेगळे झाले असल्याची खोटी माहिती दिली होती.

सुमन तूर यांनी दावा केला आहे की मी २० जानेवारीला सिद्धू यांना भेटण्यासाठी गेले होते, पण त्यांनी भेटण्यासाठी नकार दिला आणि दरवाजाही उघडला नाही. सुमन म्हटल्या आहेत की त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केले, मात्र त्याचा परिणाम झाला नसल्याने मला पत्रकार परिषदेत बोलावे लागले. सिद्धूंनी माझा नंबर ब्लॉक केला आहे. त्यांचे नोकरही दरवाजा उघडत नाही. मला आपल्या आईसाठी न्याय पाहिजे.

५८ वर्षीय सिद्धू यांच्या विरोधात सुमन तूर यांनी अशावेळेस आरोप केले आहेत की ज्या वेळेत पंजाब विधानसभेच्या निवडणूसाठी आणि मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून सिद्धू प्रचार करत आहेत. पंजाबमध्ये ११७ जांगांसाठी २० फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.

हेही वाचलतं का?

SCROLL FOR NEXT