शिलाँग, पुढारी ऑनलाईन : मेघालयाचे (Meghalaya) १३ वे मुख्यमंत्री म्हणून एनपीपीचे अध्यक्ष कॉनराड संगमा (NPP chief Conrad Sangma) यांनी आज मंगळवारी (दि.७) सलग दुसऱ्यांदा शपथ घेतली. प्रीस्टोन तायन्सॉन्ग आणि स्नियावभालंग धर यांनी मेघालयाचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. संगमा यांच्या मंत्रिमंडळात १२ मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. अबू ताहेर मोंडल, किरमेन शिल्ला, मार्कीस एन मारक, राक्कम ए संगमा, अलेक्झांडर लालू हेक, डॉ. अँपरीन लिंगडोह, पॉल लिंगडोह आणि कमिंगोन यम्बोन यांनी नवीन NPP नेतृत्वाखालील मेघालय सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांना मेघालयाचे राज्यपाल फागू चौहान (Meghalaya Governor Phagu Chauhan) यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. या शपथविधी सोहळ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा उपस्थित होते. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत संगमा यांच्या एनपीपी पक्षाने ५९ पैकी २६ जागा जिंकल्या आहेत.
नवीन सरकारच्या शपथविधीसाठी राजभवनाकडे रवाना होण्यापूर्वी कॉनराड संगमा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रार्थना सभेला उपस्थित राहून आर्चबिशप यांच्याकडून आशीर्वाद घेतले होते.
नवीन सरकारच्या शपथविधीसाठी राजभवनाकडे रवाना होण्यापूर्वी कॉनराड संगमा यांनी सर्व कॅबिनेट मंत्र्यांसह प्रार्थना सभेला उपस्थिती लावली होती. मेघालयातील प्रादेशिक पक्ष यूडीपी (UDP) आणि पीडीएफ (PDF) यांनी कॉनराड संगमा यांच्या एनपीपी (NPP) नेतृत्वाखालील आघाडी सरकारला पाठिंबा दर्शवला आहे. यामुळे संगमा यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांचे संख्याबळ ४५ झाले आहे. गेल्या शनिवारपर्यंत संगमा यांना भाजप आणि हिल स्टेट पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (एचएसपीडीपी) च्या प्रत्येकी दोन आणि अपक्षांसह ३२ आमदारांचा पाठिंबा होता. आता यूडीपी आणि पीडीएफ ह्या दोन पक्षांच्या आमदारांनी संगमांना पाठिंबा दर्शवला आहे. तर चार आमदार असलेली न्यू व्हॉईस ऑफ पीपल्स पार्टी (व्हीपीपी) आणि प्रत्येकी पाच आमदार असलेले काँग्रेस आणि टीएमसी विरोधी बाकावर बसणार आहेत.
NPPचे अध्यक्ष कॉनराड के संगमा यांनी सोमवारी सांगितले होते की त्यांच्या मेघालय डेमोक्रॅटिक आघाडी सरकार २.० मध्ये आठ मंत्री असतील, तर त्यांच्या मित्रपक्षांना चार मंत्रीपदे मिळतील. यूडीपीचे दोन मंत्री, तर भाजप आणि एचएसपीडीपीला प्रत्येकी एक मंत्रीपद मिळेल, असे संगमा यांना म्हटल्याचे वृत्त पीटीआय वृत्तसंस्थेने दिले होते.
आज मंगळवारी सलग दुसऱ्यांदा शपथ घेण्यापूर्वी यूडीपीच्या पाठिंब्याने संगमा यांच्या आघाडीला मोठा दिलासा मिळाला. पीडीएफचे अध्यक्ष गविन एम मायलीम आणि कार्याध्यक्ष बांतेइडोर लँगडोह यांनी संगमा यांच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या पाठिंब्याचे पत्र दिले आहे.
मेघालयात (Meghalaya) कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत मिळालेले नाही. पण संगमा यांचा पक्ष एनपीपीच्या नेतृत्त्वाखाली आघाडी सरकार स्थापन करण्यात आले आहे. यात एनपीपीचे २६, भाजपचे २, हिल स्टेट पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीचे २, यूडीपीचे ११ आणि पीडीएफचे २ आमदार आहेत.
कॉनराड संगमा यांचा पक्ष एनपीपीला राज्यात सर्वाधिक २६ जागा मिळाल्या आहेत. तर युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टीला ११, काँग्रेस ५, तृणमूल काँग्रेस ५, भाजप २, हिल स्टेट पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी २, पीडीएफ २, व्हीपीपी ४ आणि अपक्षांना २ जागा मिळाल्या आहेत. (Meghalaya) दरम्यान, एका जागेवरील उमेदवाराचा मृत्यू झाल्याने राज्यात ६० पैकी केवळ ५९ जागांवर नुकतीच निवडणूक पार पडली.
कॉनराड संगमा उच्चशिक्षित आहेत. त्यांनी पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून बीबीए आणि लंडन विद्यापीठाच्या इम्पीरियल कॉलेजमधून एमबीए केले आहे. २००५ मध्ये त्यांनी फायनान्समध्ये एमबीएची पदवी घेतली.
हे ही वाचा :