Latest

नाशिक : दिंडोरी तालुक्यात वेगवेगळ्या अपघातांत दोन ठार

अंजली राऊत

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा

वणी-सापुतारा रोडवर रस्त्याने जात असलेल्या पादचाऱ्यास दुचाकीची धडक बसून झालेल्या अपघातात एक जण ठार झाल्याची घटना घडली. शंकर वामन गायकवाड (रा. फोपशी, ता. दिंडोरी) असे मृताचे नाव आहे. ते वणी-सापुतारा रस्त्याने जात असताना जगदंबा पेट्रोलपंपालगत दुचाकी चालक जनार्दन गोपीनाथ भुसार (35) हे एमएच 15 – एचडी -2440 या क्रमांकाच्या दुचाकीवरून भरधाव जात असतानाच त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने शंकर गायकवाड यांना पाठीमागून दुचाकीची जबर धडक बसली. यात गायकवाड हे गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी दीपक शंकर गायकवाड यांच्या फिर्यादीवरून जनार्दन भुसार याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

दुसऱ्या घटनेत दुचाकीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात दुचाकीचालक ठार झाला. मिळालेल्या माहितीनुसार बाबूराव चव्हाण (25, रा. भवाडा, ता. सुरगाणा) हा जीजे. 21. एएन. 7522 या क्रमांकाच्या दुचाकीवरून वरखेडा-परमोरी रस्त्याने जात असताना परमोरी शिवारात त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरली. या अपघातात त्यांच्या सोबत असलेला युवराज चव्हाण याला गंभीर मार लागल्याने तो ठार झाला. बाबूराव चव्हाण हा गंभीर जखमी झाला. या प्रकरणी बाबूराव चव्हाण यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT