Latest

 नाशिक : महिलेचा विनयभंग करणाऱ्याला तीन वर्ष सश्रम कारावास

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सातपूरला महिलेचा विनयभंग करणाऱ्याला न्यायालयाने तीन वर्षे सश्रम कारावास व १५ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली. भटू शांताराम गोसावी (३५, रा. अशोकनगर, सातपूर) असे आरोपीचे नाव आहे.

त्याने एका महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी दि. २५ जानेवारी २०२३ रोजी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास करून पोलिस हवालदार अनिल आहेर यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकारी पक्षातर्फे ॲड. एफ. एल. शेख यांनी युक्तिवाद केला. भटूविरोधात गुन्हा शाबित झाल्याने प्रथम वर्ग न्यायाधीश एस. आर. कुलकर्णी यांनी भटूला शिक्षा सुनावली. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून अंमलदार वाय. डी. कोतवाल यांनी कामकाज पाहिले.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT