Latest

नाशिक : पर्यटनस्थळाला रिक्षाचालकांमुळे गालबोट

अंजली राऊत

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क

नाशिक हे धार्मिक स्थळासोबतच पर्यटन स्थळ म्हणून प्रसिध्द असल्याने येथे राज्यभरातून पर्यटक दररोज हजारोच्या संख्येने उपस्थिती लावतात. मात्र या पर्यटनस्थळाला रिक्षाचालकांमुळे गालबोट लागल्याची घटना शुक्रवार, दि. 13 दुपारच्या सुमारास नुकतीच घडली असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.

मध्यप्रदेश येथून गोदाघाट येथे आलेल्या एका पर्यटकाच्या पायावरुन रिक्षाचे चाक गेले. त्याचा जाब विचारण्यासाठी पर्यटक पुढे आला. ….. याचा राग मनात धरुन रीक्षाचालकाने आपल्या सहका-यांच्या मदतीने शेजारी असणा-या फुटपाथवरील बॅट विक्रेत्यांकडील बॅट हाती घेत थेट पर्यटकावर उगारली. त्यामुळे वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले. यामध्ये पर्यटकाला चांगलेच चोपले. त्यामुळे पर्यटन स्थळी यावे का… असा प्रश्न पर्यटकांसमोर उभा झाला आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT