Latest

नाशिक : चोराला चोर म्हटल्याने राहुल गांधींना शिक्षा : खा. संजय राऊत; आज उद्धव ठाकरेंची शिवगर्जना

अंजली राऊत

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा
मालेगावात येऊन दाखवावे, असे पालकमंत्र्यांनी मला दिलेले आव्हान स्वीकारत दोन दिवस आधीच मी मालेगावी आलो, असे सांगत, राहुल गांधींनी चोराला चोर म्हटल्यामुळे त्यांना शिक्षा झाली. तसेच मालेगावातही चोर आहेत. येथील लोकप्रतिनिधीने 'गिसाका' वाचवण्यासाठी 178 कोटी रुपये जमा केले आणि फक्त 16 कोटी 50 लाख रुपये दाखवले. त्यांची ही शेवटची निवडणूक असून त्यांचा समाचार घेण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मालेगावी येत असल्याची घनाघाती टीका खासदार संजय राऊत यांनी केली.

कॅम्प रोडवरील प्रशांतदादा हिरे व्यापारी संकुल (रॉयल हब) येथे शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर खा. विनायक राऊत, उपनेते डॉ. अद्वय हिरे, संपर्कप्रमुख जयंत दिंडे, जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, नितीन आहेर आदी उपस्थित होते. हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचे आहे. या राज्याच्या मातीमध्ये गद्दारीला आणि बेइमानीला अजिबात थारा नाही, असेही ते म्हणाले. तसेच शिक्षण व सहकारमहर्षी भाऊसाहेब हिरे व त्यांच्या कुटुंबात राज्याचे नेतृत्व करण्याची क्षमता होती. तीच क्षमता व काम करण्याची प्रचंड ऊर्जा शिवसेना उपनेते डॉ. अद्वय हिरे यांच्यातही आहे. त्यामुळे डॉ. हिरेंनी आता राज्याकडेही लक्ष दिले पाहिजे, असा सल्ला खा. संजय राऊत यांनी दिला. कार्यक्रमास जिल्हा समन्वयक पवन ठाकरे, नथुबाबा जगताप, अशोक निकम, संजय निकम, विष्णू पवार, रामा मिस्तरी, प्रकाश वाघ, डॉ. उज्जैन इंगळे, सुभाष सूर्यवंशी, हिरालाल नरवडे, बळीराम देसले, शेखर पगार, आनंदसिंग ठोके, नंदलाल शिरोळे, जगन्नाथ हिरे, गणेश खैरनार, संजय हिरे, महेश पवार, विनोद बोरसे, विठोबा छरंग, प्रवीण पगार, महेंद्र देवरे, जालिंदर शेलार, अक्षय पवार, नितीन गायकवाड, किशोर निकम, प्रवीण शेवाळे, शेखर पवार, तुषार अहिरे, जितेंद्रसिंग ठाकोर, भगवान शिंदे, नाना देवरे, नरेंद्र भदाणे, रमेश देसले, उमाकांत देशमुख, जितेंद्र देसले, राजाराम जाधव, कैलास तिसगे, सचिन भडांगे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

आज उद्धव ठाकरेंची शिवगर्जना
शिवसेनेत उभी फूट पडून अखेरच्या क्षणी ना. दादा भुसे हे ठाकरे गटात डेरेदाखल झाले. त्यानंतर प्रथमच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ना. भुसे यांच्या बालेकिल्ल्यात दाखल होत आहेत. रविवारी (दि. 26) सायंकाळी 5 ला कॉलेज ग्राउंडवर ही शिवगर्जना सभा होणार असून, त्याचे नियोजन उपनेते डॉ. अद्वय हिरे यांच्या नेतृत्वाखाली नियोजन झाले आहे. सेनेचे मोठे नेते शुक्रवारी, शनिवारीच शहरात दाखल झाले आहेत.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT