Latest

Nashik Onion Price : लासलगावी कांदा ४०० रुपयांनी घसरला

गणेश सोनवणे

लासलगाव(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये साठवलेल्या उन्हाळ कांद्याची प्रतवारी आणि गुणवत्ता घसरल्याने दरात कालच्या तुलनेत ४१० रुपये प्रतिक्विंटलची घसरण झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. मंगळवारी (दि.21) कमाल ३८४७ रुपये प्रतिक्विंटलने विक्री झालेला कांदा बुधवारी (दि.22) कमाल ३४३७ रुपये प्रतिक्विंटलने विक्री झाला. तर तेच हाल लाल कांद्याबाबतही पाहायला मिळाले. लाल कांदा ३४७ रुपये प्रतिक्विंटलने घसरल्याचे दिसून आले. राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून नवीन कांद्याची आवक वाढल्याने उन्हाळ कांद्याच्या मागणीमध्ये घट झाली आहे. याचाच फटका कांदादराला बसला आहे. (Nashik Onion Price)

गेल्या महिन्यात कांद्याच्या किमान निर्यातमूल्य दरात आठशे डॉलर प्रतिटन वाढ केल्याने निर्यात जवळपास ठप्प झाली होती. तर नाफेडने साठवणूक केलेला दोन लाख टन कांदा किरकोळ बाजारात 25 रुपये प्रतिकिलो दराने विक्री सुरू झाल्याने त्याचा परिणाम कांद्याच्या दरावर झाल्याचे दिसून येत आहे. एकाच दिवसात कांद्याच्या दरामध्ये सुमारे ४०० रुपयांची घसरण झाल्याचे दिसून आले. स्थानिक बाजारपेठांमधील कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी कांद्यावरील निर्यात मूल्य दर ८०० डॉलर प्रतिटन करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. किरकोळ बाजारात कांद्याने साठ रुपये किलोचा दर ओलांडल्याने केंद्राने धसका घेत ग्राहकांना दिलासा देण्यासाठी ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत वाढ केली आहे. नवीन कांदा ही राज्यातील बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल होत आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ कांद्याला कमीत कमी २०००, सरसरी ३२०० जास्तीत जास्त ३८४७ भाव मिळाले. तर लाल कांद्याला कमीत कमी २७५२, सरासरी ४२०० जास्तीत जास्त ४६५७ भाव मिळाले. (Nashik Onion Price)

२ लाख टन कांदा बाजारात

केंद्राने ग्राहकांना दिलासा देण्यासाठी किरकोळ बाजारातील कांद्याची विक्री 'बफर स्टॉक'मधून 25 रुपये प्रतिकिलो या सवलत दराने करण्याचा निर्णय घेतला. ग्राहक व्यवहार मंत्रालय नॅशनल कन्झ्युमर को-ऑपरेटिव्ह फेडरेशन ऑफ इंडिया आणि नॅशनल अॅग्रिकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून २ लाख टन कांदा किरकोळ बाजारात पाठविण्यास सुरुवात झाली आहे. हा कांदा २५ रुपये प्रतिकिलो या सवलत दरात विक्री मोठ्या शहरात सुरू झाली आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT