Latest

Nashik News : कोरोनाच्या नवीन व्हेरीएंटच्या धोक्याने जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा सतर्क

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– देशात पुन्हा कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने राज्यातील आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने जिल्हा रुग्णालयासह उप, ग्रामीण रुग्णालयांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. तसेच खबरदारी घेण्यासोबत रुग्णालयांमध्ये कक्षाचे नियोजन, संशयितांची चाचणी करण्यास सुरुवात केली आहे.

काेरोनाचा जेएनवन हा नविन व्हेरीएंट तयार झाल्याने आरोग्य यंत्रणेसमोरील आव्हाने वाढले आहे. केरळ राज्यात सर्वाधिक काेरोनाबाधित आढळून येत आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाला असून त्यांनी खबरदारी घेण्याच्या सुचना केल्या आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयांमध्ये पुर्वतयारी करण्यात आली आहे. रुग्णांची कोरोना चाचणी पुन्हा केली जात असून अद्याप एकही कोरोनाबाधित आढळून आलेला नाही. मात्र खबरदारी म्हणून सतर्कतेच्या सुचना दिल्या आहेत.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT