Latest

Nashik News : राज्यपाल रमेश बैस आज नाशिक दौऱ्यावर

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस गुरुवारी (दि.१२) दौऱ्यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात आढावा बैठका होत आहेत.( Nashik News)

आरोग्य विद्यापीठातील डॉ. डी. वाय. डोणगावकर सभागृहात सकाळी १०.४५ वाजता राज्यपालांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. बैठकीस विद्यापीठाचे कुलगुरू लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त), प्रति-कुलगुरू डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ आदी उपस्थित राहतील. यासंदर्भात डॉ. बंगाळ यांनी सांगितले की, कुलपती तथा राज्यपाल यांना विद्यापीठ आढावा बैठकीत कुलगुरूंकडून विद्यापीठाच्या शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजाबाबत माहिती दिली जाणार आहे. विद्यापीठ कामकाजाबाबतचा व्हिडिओ स्वरूपात माहितीपट कुलपतींना दाखविण्यात येईल. आरोग्य शिक्षणासंदर्भात विविध विषयांवर चर्चा, विद्यापीठाचा ग्रीन कॅम्पस आदींबाबतही माहिती देणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुक्त विद्यापीठात होणाऱ्या बैठकीत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०, परीक्षा निकाल, विद्यापीठातील पायाभूत सुविधा, तसेच इतर कामांसंदर्भात आढावा घेतला जाणार आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT