Latest

Nashik News : नवजात शिशूचा जन्मताच मृत्यू, डॉक्टरांच्या हातातून बाळ निसटून पडल्याचा पालकांचा आरोप

गणेश सोनवणे

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा, आडगाव शिवारातील डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज येथे नवजात शिशूचा प्रसुतीनंतर डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप पालकांनी केला असुन याबाबत अधिक तपास आडगाव पोलीस करत आहे. याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असतो तो हाेऊ शकला नाही. (Nashik News)

संबधित बातम्या :

याबाबत अधिक माहिती अशी की, सुरज लक्ष्मण जाधव यांनी आपली पत्नी फाल्गुनी सुरज जाधव यांना मेडिकल कॉलेज येथे सोमवारी (दि.२) सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास प्रसुती करता दाखल केले होते. सायंकाळच्या सुमारास सदर महिलेची प्रसुती झाल्यानंतर बाळ रडत नसल्याने तेथे उपस्थित असलेल्या डॉ. सोनाली डावरे यांनी त्या नवजात बाळाला तपासले असता ते मयत असल्याचे घोषित केले.

बाळाचे वडील सुरज जाधव यांनी डिलिव्हरी करताना उपस्थित असलेल्या डॉक्टर व इतर स्टाफच्या हलगर्जीपणामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. यात बाळ जन्माला आल्यानंतर ते डॉक्टरांनी हातात घेतले असता त्यांच्या हातातून बाळ निसटून जमीनवर पडले आणि बाळाच्या डोक्याला मार लागल्याने ते मयत झाले असा आरोप जाधव यांनी डॉक्टरांवर केला आहे. सदरच्या प्रकारानंतर पालकांनी व नातेवाईकांनी डॉक्टरांकडून उपचार केलेल्या फाईलची मागणी केली असता ती त्यांना देण्यात आली नसल्याचा आरोप केला जात आहे. जर बाळाचा मृत्यू नैसर्गिक झाला आहे असे म्हणणे आहे, तर मग उपचारांची फाईल ताब्यात द्यायला एवढे का घाबरतात असा सवाल सुरज जाधव यांनी उपस्थित केला. या घटनेमुळे मेडिकल कॉलेजमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

सदरच्या घटनेची माहिती मिळताच आडगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे, गुन्हे शोध पथकाचे स.पो.उ. सुभाष जाधव, विलास चारोस्कर यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेचा अधिक तपास पो.ह. एच.डी. देवरे करीत आहे.

प्रसुतीनंतर नवजात शिशूच्या मृत्यूची घडलेली घटना अतिशय दुर्देवी आहे. यामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांवर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी.

– सुरज जाधव (मयत बाळाचे वडील)

 

सदरच्या घटनेची सत्यता पडताळून पाहण्यासाठी सिव्हिल सर्जन यांच्या अधिपत्याखाली चौकशी समिती गठीत झालेली आहे. समितीच्या अहवालात जर कोणी दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

– गणेश न्हायदे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक,

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT