चंद्रपूरात महाऔष्णिक विज केंद्रातील दोन कालबाह्य चिमण्या पाडल्या | पुढारी

चंद्रपूरात महाऔष्णिक विज केंद्रातील दोन कालबाह्य चिमण्या पाडल्या

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर शहरालगतच्या उर्जानगर येथील महाऔष्णिक विज केंद्रात मागील पाच वर्षांपासून कालबाह्य झालेल्या आणि बंद अवस्थेतील दोन्ही संचाच्या चिमण्या आज बुधवारी पाडण्यात आल्या. अनेक वर्षापर्यंत दोन्ही संचाच्या चिमण्यामूधन प्रत्येकी 210 या प्रमाणे 420  मेगावॅट क्षमतेची विज निर्मीती होत होती.
चंद्रपूर  शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर उर्जानगर येथे महाऔष्णिक वीज केंद्र आहे. या ठिकाणावरून विज निर्मीती होऊन मुंबई शहरासह राज्यात पाठविली जाते. अनेक वर्षापर्यंत क्रं. 1 व क्रं. 2 संचामधून प्रत्येकी 210 प्रमाणे 420 मेगावॅट क्षमतेची विज निर्मिती करण्यात येत होती.  परंतु त्या कालबाह्य झाल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात प्रदूषणाची भर पडत होती. त्यामुळेच दोन्ही संच मागील पाच वर्षांपासून बंद करण्यात आले आहे. परंतु उर्जानगरच्या महाऔष्णिक विज केंद्रात दोन्ही चिमण्या मात्र उभ्या होत्या. महाऔष्णिक विज प्रशासनाने या ठिकाणची जागा मोकळी करण्याच्या उदेश्याने चिमण्या पाडण्याचा निर्णय घेतला. आज बुधवारी दोन्ही चिमण्या पाडण्याची कार्यवाही करण्यात आली. कालबाह्य झालेले आणि बंद असलेले दोन्ही संच जशाच्या तशा उभ्या असल्याने वीज केंद्रात बरीच जागा व्यापलेली होती. त्यामुळे त्या परिसरात अन्य कामे करणे अडचणीचे ठरत होते. जागा मोकळी करण्यासाठी आज बुधवारी या दोन्ही संचाच्या चिमण्या पाडण्यात आल्या. त्यामुळे बरीच जागा मोकळी झाली आहे, याबाबतची माहिती महाऔष्णिक विज केंद्राचे मुख्य अभियंता गिरीश कुमरवार यांनी दिली.

Back to top button