Latest

Nashik Sinner : अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा बछडा गंभीर जखमी

गणेश सोनवणे

सिन्नर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा

सिन्नर – घोटी  महामार्गावर लोणारवाडी परिसरात युवा मित्र सामाजिक संस्थेच्या कॅम्पस समोर रविवारी (दि. 12) रात्री दहा ते सव्वा दहाच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा बछडा गंभीर जखमी झाला.

प्रवाशांसह स्थानिक नागरिकांनी तातडीने बछड्याला रस्त्याच्या बाजूला हलवले. त्यानंतर वनविभागासह पोलिसांना माहिती देण्यात आली. वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल साळवे, सुधीर बोकडे, सदगीर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. बछड्याला प्राथमिक उपचारानंतर नाशिक येथे हलविण्यात आले. एक ते दीड वर्ष वयाच्या या गंभीर जखमी बछड्याची प्रकृती स्थिर असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, अपघातानंतर सिन्नर पोलिसांसह महामार्ग वाहतूक नियंत्रण विभागाच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी हे घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT