Latest

Nashik : उद्योगमंत्र्यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये उद्या रोजगार मेळावा

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

बाळासाहेबांची शिवसेनेतर्फे रविवारी (दि.४) बेरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास उद्योगमंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच पालकमंत्री दादा भुसे हेदेखील उपस्थित असतील, अशी माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.

खासदार गोडसे म्हणाले की, 'राज्यातील वाढत्या बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर अजिंक्य गोडसे यांच्या संकल्पनेतून लक्ष्मी लॉन्स येथे सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेदरम्यान हा मेळावा होणार आहे. मेळाव्यात पुणे (७८), नाशिक (२५), औरंगाबाद (१०) याप्रमाणे सुमारे १०३ कंपन्या सहभागी होणार आहेत. मेळाव्यात आतापर्यंत दहावी ते बारावीपासून तर विविध क्षेत्रांतील अभियांत्रिकीच्या पदवीधरांनी नोंदणी केली आहे. दोन हजारांहून अधिक युवकांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे.

मेळाव्याला नोंदणीशिवाय ऐनवेळी ऑफलाइन पद्धतीने सहभागी होण्यासाठी अनेक युवकांना आवाहन करण्यात आले आहे. त्यात मोठ्या संख्येने युवक उपस्थित राहणार आहेत. मेळाव्याच्या दिवशी दिवसभरात दोन हजारांवर युवकांना दोन्ही मंत्र्यांच्या हस्ते नियुक्तिपत्र दिली जाणार आहेत. युवकांच्या नावनोंदणीसाठी यापूर्वीच ऑनलाइन लिंक देण्यात आली होती. त्यावर आतापर्यंत मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.