Latest

नाशिक : माजी पोलीस आयुक्त दीपक पांडेंचा भोंग्याबाबतचा आदेश नव्या आयुक्तांकडून रद्द

गणेश सोनवणे

नाशिक : माजी पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांचा भोंग्याबाबतचा मनाई आदेश नवे पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी रद्द केला आहे.  भोंग्याबाबतची शहरातील सर्व परिस्थितीती विचारात घेता स्वतंत्र आदेशाची गरज नसल्याचे नव्या पोलिस आयुक्तांनी म्हटले आहे.

17 एप्रिलला दीपक पांडेय यांनी भोंग्याबाबत मनाई आदेश जारी केला होता. या आदेशानुसार 3 मेपर्यंत भोंग्यासाठी परवानगी न घेतल्यास थेट कारवाईला सामोरे जावे लागणार होते. मात्र नवनियुक्त पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी नवीन आदेश काढून 17 एप्रिलचे आदेश रद्द करण्यात येत असल्याचे सांगितले.

17 एप्रिल रोजी तत्कालीन पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी सर्व धर्मियांना भोंगे आणि इतर साउंड सिस्टीम वाजवण्यासाठी पूर्व परवानगीचा आदेश दिला होता. मात्र, भोंग्याबाबत महाराष्ट्र शासन जो निर्णय घेईल त्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांचे मत आहे. त्यामुळे पोलिस आयुक्त नाईकनवरे यांनी पदभार स्वीकारल्यावर अवघ्या पाच दिवसांनीच पांडेय यांचा आदेश रद्द केला आहे. नाशिक शहरात स्वतंत्र आदेशाची गरज दिसत नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले जाईल असे त्यांनी आदेशात म्हटले आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT