Latest

Nashik : दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नांदगावी महिलांचा ढोल-ताशे वाजवत मोर्चा

गणेश सोनवणे

नांदगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

शहरातील आनंद नगर परिसरात दूषित पाणी पुरवठा होत असल्याने आनंद नगर भागातील महिलांनी छत्रपती संभाजी नगर रोड वर दूषित पाण्याच्या बाटल्या ठेऊन रास्ता रोको केला. त्यानंतर नांदगाव नगरपरिषदेच्या आवारात ढोलताशे वाजवत मोर्चा काढला.

रास्ता रोकोवेळी महिलांनी प्रशासनाला धारेवर धरले. नळ पट्टी वसुली साठी ढोल ताश्याच्या गजरात घरी येऊन वसुली केली जाते मग आम्हाला दूषित पाण्याचा पुरवठा का केला जातो असा सवाल उपस्थित केला. पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी, नगर परिषद अधिकारी यांच्या मधस्ती नंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला.

त्यानंतर दुपारी परत  महिलांनी ढोल ताश्याच्या गजरात नांदगाव नगर परिषद कार्यालयावर भर पावसात मोर्चा वळवला. तिसऱ्या रेल्वे लाईनचे काम सुरु असल्याने रेल्वे ट्रॅक जवळील पाईपलाईन फुटली आहे, त्यात माती जाऊन थेट पाण्याच्या टाकीत गेल्याने पाणी गढूळ झाले असून ते पाणी वापरू नये. लवकरच शुद्ध पाणी पुरवठा केला जाईल असे आश्वासन मुख्यअधिकारी विवेक धांडे यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT