Latest

नाशिकच्या डॉक्टरची सिन्नरमध्ये आत्महत्या ; सलाईन लावलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

गणेश सोनवणे

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा

नाशिकमधील गंगापूर भागात राहणाऱ्या एका एमबीबीएस डॉक्टरने यकृताचा बळावलेला आजार आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून सिन्नर येथील एका लॉजमध्ये आत्महत्या केल्याचा प्रकार रविवारी (दि.10) सायंकाळी 6.30 वाजेच्यासुमारास उघडकीस आला. डॉ. स्वप्नील पाटील (37, रा. गंगापुररोड, नाशिक) असे मयत डॉक्टरचे नाव असून आत्महत्येपुर्वी त्या डॉक्टरने लिहून ठेवलेली सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली आहे.

शहरातील बसस्थानकाजवळील हिरालाल टॉवरमधील हॉटेल प्रेसिडेंट लॉजमध्ये डॉ. पाटील हे शनिवारी (दि.9) दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास आले होते. रुम नं. 109 त्यांनी भाड्याने घेतल्यानंतर सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास या रुममधून बाहेर आल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसले. त्यानंतर त्यांनी रुमचा दरवाजा उघडला नाही. रविवारी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास संशय बळावल्याने लॉजवरील कर्मचाऱ्याने दरवाजा ठोठावला मात्र आतून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्याने दरवाजाच्या वरच्या भागातील खिडकीतून आत पाहिले असता बेडवर डॉ. पाटील दिसून आले.

माजी नगरसेवक शैलेश नाईक यांनी यासंदर्भात सिन्नर पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक सुदर्शन आवारी, हवालदार चेतन मोरे यांनी घटनास्थळी धाव घेत रुमचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. यावेळी डॉ. पाटील यांचा मृतदेह बेडवर पडलेला दिसून आला. स्वतःच डॉक्टर असल्याने त्यांनी रुमच्या खिडकीला सलाईन टांगून ते हाताला लावून घेतले होते. याशिवाय काही गोळ्याही त्यांनी सेवन केल्याचे आणि अर्धवट रिकामी पाकीटे मृतदेहाजवळ आढळून आले. दारूची बाटलीही घटनास्थळी पडून होती.

पोलिसांनी जागेवर पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. डॉक्टरांनी रक्तनमुना आणि व्हीसेरा राखून ठेवला असून डॉ. निर्मला गायकवाड यांनी शवविच्छेदन केल्यानंतर रात्री उशिरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

सुसाईड नोटमध्ये लिहिले आत्महत्याचे कारण…
सुसाईड नोटमध्ये हे कृत्य स्वतःच्या मर्जीने करत असून माझ्यावर कुठलाही दबाव नाही. पत्नीने आत्तापर्यंत खूप साथ दिली. आईवडीलांनी, भावाने काबाडकष्ट केले. मात्र लिवरच्या आजाराने त्रस्त असल्याने मी आत्महत्या करत असून त्यास इतर कोणालाही जबाबदार धरू नये. मी माझे कर्तव्य पार पाडू शकलो नाही, त्याबद्दल मला क्षमा करावी. आजारपणामुळे कर्ज झाले आहे. त्यामुळे आत्महत्येशिवाय पर्याय उरला नाही. असे डॉ. पाटील यांनी सुसाईडनोटमध्ये लिहून ठेवले आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT