Latest

नाशिक : राज्यातील ३९ सहायक वनसंरक्षकांमध्ये खांदेपालट

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील ३९ सहायक वनसंरक्षक तथा उपविभागीय वनाधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश बुधवारी (दि.३१) निर्गमित करण्यात आले असून, त्यात नाशिक वनवृत्तातील सहा एसीएफचा समावेश आहे. या बदल्यामुळे नांदूरमध्येश्वर आणि यावल अभयारण्याला आता पूर्णवेळ अधिकारी मिळाले आहेत. मात्र, गेल्या कित्येक महिन्यांपासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या सहायक वनसंरक्षकांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित झाल्याने बढतीचा निर्णय काहीसा लांबण्याची शक्यता आहे.

नाशिक पूर्व वनविभागात विशेष कामगिरी केलेल्या सहायक वनसंरक्षक हेमंत शेवाळे यांची यावल अभयारण्याच्या फिरत्या पथकात, तर डॉ. सुजित नेवसे यांची धुळे येथे (तांत्रिक) एसीएफपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सहा महिन्यांपासून रिक्त असलेल्या नांदूरमध्यमेश्वर अभयारण्य सहायक वनसंरक्षकपदी तृप्ती निखाते यांची बदली करण्यात आली आहे. तर, दारणाकाठ बिबट्या-मनुष्य संघर्षासह संतोषा-भागडी उत्खनन प्रकरण हताळणाऱ्या गणेश झोळे यांची यावल अभयारण्यात नियुक्ती केली आहे. मालेगावचे उपविभागीय वनाधिकारी जगदीश येडलावार यांची जालना संशोधन केंद्रात वर्णी लागली.
दरम्यान, नाशिकच्या सहा सहायक वनसंरक्षकांची बदली झाली आहे. मात्र, त्यांच्या जागी इतर कोणाचीही नियुक्ती न करण्यात आल्याने संबंधित एसीएफ यांनाच पुढील काही दिवस जबाबदारी सांभाळावी लागणार आहे. बदलीपात्र ठरलेल्या एसीएफमध्ये काही जणांना लवकरच पदोन्नती मिळणार असल्याने पुन्हा पदस्थापनेत बदलाची शक्यता आहे.

६४ वनरक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या
पश्चिम वनविभागातील एकूण ६४ वनरक्षकांच्या बदल्यांचे आदेश उपवनसंरक्षक पंकज गर्ग यांनी काढले. यात अवघड क्षेत्रातील ४७, तर बिगर अवघड क्षेत्रातील १७ वनरक्षकांचा समावेश आहे. तब्बल ३० महिला वनरक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. बदलीपात्र कर्मचाऱ्यांना तत्काळ कार्यमुक्त करावे, असे आदेशात म्हटले आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT