Latest

नाशिक : “त्या” आश्रमशाळेची मान्यता रद्द करा – अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जोपूळ (ता. दिंडोरी) येथील यशवंत पाटील एज्युकेशन सोसायटी संस्था संचलित आश्रमशाळेतील इयत्ता सहावीत शिक्षण घेणारा विद्यार्थी संकेत ज्ञानेश्वर गालट (११, रा. सावर्णा, ता. पेठ) याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच गालट याचा मृत्यू झाला असून, या प्रकरणी दोषी कर्मचाऱ्यांसह संस्थेची मान्यता रद्द करा, अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने निवेदनाद्वारे केली आहे.

जोपूळ येथील प्राथमिक आश्रमशाळेतील मुख्याध्यापिका संध्या भास्कर साखरे, शिक्षक भरत रमाकांत गुळवे व अधीक्षक एकनाथ दाजी भामरे यांच्या निष्काळजीपणामुळे संकेत गालट याला जीव गमवावा लागला. गेले १५ दिवस संकेत आजारी असतानाही त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले नाही. वेळीच उपचार मिळाले असते तर संकेतचा जीव वाचला असता. या प्रकरणी तिघांचे संस्थेने तत्काळ निलंबन केले असून, त्यांच्या मान्यतेचे प्रस्तावही अपर आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. प्रस्तावावर तत्काळ अमंलबाजवणी करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली. विविध मागण्यांचे निवेदन उपआयुक्त सुदर्शन नगरे यांना देण्यात आले. यावेळी परिषदेचे प्रदेश युवाध्यक्ष लकी जाधव, कार्याध्यक्ष गणेश गवळी, सोनू गायकवाड, मोहन खाडे, सागर खेताडे, भाऊसाहेब बेंडकुळे आदी उपस्थित होते.

मुख्याध्यापिकेसह तिघांचे निलंबन
आदिवासी विद्यार्थ्याच्या मृत्यूची संस्थेने गंभीर दखल घेत मुख्याध्यापिका संध्या भास्कर साखरे, शिक्षक भरत रमाकांत गुळवे व अधीक्षक एकनाथ दाजी भामरे यांना तत्काळ निलंबित केले आहे. तसेच हलगर्जीपणा केल्याप्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे पत्र पोलिसांना देण्यात आले आहे. तर तिघांची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव अपर आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT