Latest

Nashik Accident News | समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; वाहन चकणाचूर, 2 ठार तर 3 गंभीर

अंजली राऊत

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
नागपूर-मुंबई हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गावर गुरुवारी (दि.१८) सकाळी ७.४५ च्या सुमारास ५५७.४ किमी अर्थातच सिन्नर तालुक्यातील खंबाळे शिवारात महिंद्रा स्कॉर्पिओचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातमध्ये दोन ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

बाजीराव एकनाथ गांगुर्डे हे जागीच ठार झाले असून निशा रामकिसन गडगूळ (२०) हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. छत्रपती संभाजीनगरकडून नाशिककडे जाणाऱ्या महिंद्रा स्कॉर्पिओ वाहनावरील (क्र.एमएच २० -जीटी ००९१) वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या साईड बॅरियरला तोडून दोन्ही लेनच्या मधोमध असलेल्या चारीमध्ये जाऊन पलटी झाली.

वाहनचालक परमेश्वर पुंडलिक गडगूळ (२१) मिनाबाई रामकिसन गडगूळ (४६, सर्व रा. करवड ता. जि.संभाजीनगर) गंभीर जखमी झाले आहेत. वावी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच सहाय्यक निरीक्षक संदेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर, हवालदार एच. डी. कदम, एस. एन. आडके आदींनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना समृद्धी महामार्गाकडील रुग्णवाहिकेने औषधोपचारांसाठी सिन्नर व नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. अपघातग्रस्त वाहन मुख्य रस्त्याच्या बाजूला असल्याने वाहतूक सुरळीत सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT