Latest

‘प्रपोगंडा’ फिल्‍मवर नसीरुद्दीन शाह म्‍हणाले, ‘ज्‍यांचे मत महत्त्‍वाचे तेच…”

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मागील काही महिन्‍यांपासून बॉलीवूडमध्‍ये 'प्रपोगंडा' फिल्‍म ( प्रचारकी चित्रपट ) वर आरोप- प्रत्‍यारोप सुरु आहेत. आपल्‍या मतांवर ठाम राहणारे कलाकार, अशी ओळख असणारे ज्‍येष्‍ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी यावर आपलं मत व्‍यक्‍त केले आहे. ( Propaganda Film)
एका माध्‍यम समूहाला दिलेल्‍या मुलाखतीत नसीरुद्दीन शाह यांनी म्‍हटलं की, 'प्रपोगंडा' फिल्‍म ( प्रचारकी चित्रपट ) विरोधात लढण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे त्यांच्याविरोधात कलाकारांनीच बोलावे. कट्टरता, प्रचार आणि चुकीची माहिती पसरवण्यासाठी बनवलेल्या चित्रपटांशी लढण्याचा एकमेव मार्ग म्हणजे कलाकारांनी बोलणे आणि बदल घडवून आणण्यासाठी स्‍वत:चा आवाज वापरणे. मात्र समस्या अशी आहे की बरेच लोक तसे करण्यास तयार नाहीत, अशी खंतही त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

Propaganda Film : सिनेमातील हा टप्पा चिंताजनक

मागील काही महिन्‍यांपासून संवेदनशील विषयांवर चित्रपट वादाच्‍या भोवर्‍यात अडकत आहेत. देशातील अनेक लोक त्यांना प्रचारात्मक चित्रपट म्हणत आहेत. नसीरुद्दीन शाह यांनी सिनेमातील हा टप्पा चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. जो अभिनेता बोलतो आणि त्याच्या जागतिक दृष्टिकोनाशी जुळत नसलेल्या कोणत्याही गोष्टीचे समर्थन करत नाही, अशावर टीका हाेते.

नसीरुद्दीन म्हणाले, ' तुमच्या स्वतःच्या समजुतींना विरोध करणार्‍या चित्रपटांचा तुम्‍ही हिस्‍सा बनू नका. तुमच्या विश्वासांवरच घाला घालणारे  कोणतेही काम करू नका. मात्र अलिकडे दुर्दैवाने हे बर्‍याच लोकांच्या बाबतीत होत नाही. कारण जे बोलतात त्यामुळे काही फरक पडत नाही; पण ज्यांच्या बाेलण्‍यामुळे फरक पडताे  ते गप्‍प आहेत. ते सगळे घाबरलेले असतात. त्या सर्वांना ज्‍यांच्‍याकडे यश आहे त्‍यांच्‍याच बाजूने राहायचे आहे, असेही त्‍यांनी सांगितले.

योग्य प्रश्न उपस्थित केले पाहिजेत

'कला म्‍हणजे उत्तर देणे नव्‍हे. मात्र कलाकारांनीयोग्य प्रश्न उपस्थित केले पाहिजेत. हे काही प्रमाणात ठीक असू शकते; परंतु ती कृती केव्हा होते यावर अवलंबून असते. यासाठी न घाबरता लढा द्यावा लागेल, असेही शाह यांनी सांगितले.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT