Latest

‘आठवड्याला ७० तास काम’, नारायण मूर्तींचे इतर उद्योगपतींकडून समर्थन

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : उद्योगपती सज्जन जिंदाल आणि ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी शुक्रवारी (दि.२८) इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांच्या विधानाचे समर्थन केले. भारतातील तरुणांनी आठवड्यातून किमान ७० तास काम केले पाहिजे, असे विधान नारायण मूर्ती यांनी केले होते. (Narayana Murthy)

सज्जन जिंदाल म्हणाले की, "पाच दिवसांच्या आठवड्याची संस्कृती भारतासारख्या वेगाने विकसित होत असलेल्या देशाला आवश्यक नाही. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी दररोज १४-१६ तास काम करतात. माझे वडील १२-१४ तास, आठवड्याचे ७ दिवस काम करायचे. मी दररोज १०-१२ तास काम करतो," भारताची सर्वात मोठी ताकद ही तरुणाई आहे यावर जोर देऊन जिंदाल म्हणाले की, देशाच्या महासत्ता बनण्याच्या प्रवासात तरुण पिढीने विश्रांतीपेक्षा कामाला प्राधान्य द्यावे लागेल. (Narayana Murthy)

ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भाविश अग्रवाल म्हणाले, "मूर्ती यांच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे. कमी काम करण्याचा आणि स्वतःचे मनोरंजन करण्याचा हा आमचा क्षण नाही. त्याऐवजी, इतर देशांनी अनेक पिढ्यांमध्ये जे निर्माण केले आहे ते १ पिढीमध्ये तयार करण्याचा हा आमचा क्षण आहे." (Narayana Murthy)

हेही वाचंलत का?

SCROLL FOR NEXT