Latest

नंदुरबार : शहाद्यात ट्रॅव्हल बसला अपघात ; १५ प्रवासी जखमी, एक चिंताजनक

गणेश सोनवणे

शहादा : गुजरात राज्यातील सुरत येथून मध्यप्रदेशकडे जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सचा भिषण अपघात झाला असून अपघातात १५ प्रवासी जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

गुजरात राज्यातील सुरत येथून मध्यप्रदेशाकडे जाणाऱ्या सुरत खरगोन बसचा शहादा शहरातील प्रकाशारोडवरील १३२ केवी सब स्टेशन जवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने पहाटेच्या सुमारास अपघात झाला आहे. अपघातात बस पलटी होऊन १५ ते २० प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी काही प्रवाश्यांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर शहादा शहरातील खाजगी आणि सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

पहाटे तीन वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर मोठ्या प्रमाणात आवाज झाल्याने आणि प्रवाशांनी मदतीची याचना करण्यासाठी गोंगाट केल्याने रात्रीची ग्रस्त करीत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पवार, दिपक भोई, अनमोल राठोड, विजय (नारायण) कानडे यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. पलटी झालेल्या बसमधून प्रवाशांना मदतकार्य करण्यात आले. तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पवार यांनी रुग्णवाहिकेस पाचारण करून जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले. त्यानंतर वाहतूक पोलीस अनिल पावरा यांनी वाहतूक सुरळीत केली.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT