Latest

नांदेड : आलूवडगाव येथील शेतकऱ्याची मुलगी झाली विक्रीकर निरीक्षक, राज्यात मिळवला पाचवा क्रमांक

मोहन कारंडे

गडगा; पुढारी वृत्तसेवा : नायगाव तालुक्यातील आलूवडगाव येथील शेतकरी कुंटुंबांतील मंगल भगवानराव इंगोले हिची राज्य विक्रीकर निरीक्षकपदी निवड झाली आहे. खुला प्रवर्गातून मुलींमधून राज्यात पाचव्या क्रमांकाने तिने यश मिळवले आहे.

मंगल हिने जनता कॉलेज नायगाव येथून बी.ए.ची पदवी घेतली. त्यानंतर तिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षांचा अभ्यास सुरू केला होता. २०२२ मध्ये एमपीएससीने घेतलेल्या राज्य विक्रीकर निरीक्षक परिक्षेत तिला यश मिळाले. राज्यात खुला प्रवर्गातून मुलींमधून पाचवा क्रमांक मिळवून तिने घवघवीत यश संपादन केले आहे. या यशात आई-वडील आणि भाऊ यांचा मोलाचा वाटा असल्याचे मंगल हिने सांगितले. आई-वडिलांनी शेतीमध्ये काबाडकष्ट करून शिक्षण दिले. त्यामुळेच विक्रीकर निरीक्षक पदापर्यंत पोहचू शकलो अशी प्रतिक्रिया तिने दिली. मंगलच्या या यशाबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT