Latest

नागपूर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नवी दिल्लीकडे रवाना

निलेश पोतदार

नागपूर : पुढारी वृत्‍तसेवा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 2 दिवसांच्या नागपूर भेटीनंतर भारतीय वायुसेनेच्या विमानाने आज (शनिवार) दुपारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नवी दिल्लीकडे प्रस्थान केले. पुणे येथील कार्यक्रम करून त्या नागपुरात आल्या. एकंदर 4 दिवसांचा त्‍यांचा हा महाराष्ट्र दौरा होता.

नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (मेडिकल) अमृत महोत्सवाचे उद्घाटन व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूरच्या १११ व्या दीक्षांत समारंभात राष्ट्रपती प्रमुख पाहुण्या म्हणून आज (शनिवारी) उपस्थित होत्या.

राष्ट्रपती शुक्रवारी रात्री नागपूर राजभवन येथे मुक्कामी होत्या. शनिवारी सकाळी सुरेश भट सभागृहामध्ये विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ आटोपल्यानंतर राष्ट्रपती थेट नागपूर विमानतळावर पोहोचल्या. त्‍यांना निरोप देण्यासाठी राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एअर मार्शल विवेक गर्क, ब्रिगेडिअर राहुल दत्त, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार आदी उपस्थित होते.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT