Latest

धक्‍कादायक : मायलेकी नाल्यात गेल्या वाहून, नागपूरमधील भीम नगर परिसरातील घटना

मोहन कारंडे

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूर येथे नाल्याच्या पूरात मायलेकी वाहून गेल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. सुमधा मात्रे व मुलगी अर्चना मात्रे (वय १७) अशी त्यांची नावे आहेत. या घटनेची नोंद एमआयडीसी पोलिस ठाण्यात झाली आहे.

अधिक माहीती अशी की, भीम नगरमधून जाणाऱ्या उताराच्या रस्त्यात रात्री पावसाचे पाणी साचले होते. हा रस्ता बाजूच्या तळ्याला जाऊन मिळतो. तर तळ्याला लागूनच एक नाला आहे. रविवारी रात्री दोघी मायलेकी घरी जात असताना मुलीच्या आईला रस्ता लक्षात आला नाही. त्यामुळे नाल्याच्या पाण्यात घसरल्याने दोघीही पाण्यासोबत वाहून गेल्या. महिलेचा मृतदेह एक किलोमीटर अंतरावर सापडला तर मुलीचा मृतदेह तळ्यात आढल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचलंत का?

SCROLL FOR NEXT