नागपूर ; पुढारी वृत्तसेवा नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील विजयाचा आनंद नक्कीच आहे. मात्र येणाऱ्या लोकसभा निवणुकीचे आव्हान आपल्यासमोर आहे. उगाच गाफील राहू नका असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रदेश भाजप पदाधिकारी बैठकीत बोलताना कोराडी येथे केले.
फडणवीस म्हणाले, प्रत्येक निवडणूक ही आव्हान म्हणूनच पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी घ्यायची असते. ५ राज्यांची विधानसभा निवडणूक यापूर्वी आगामी लोकसभेची तयारी म्हटली जात होती. देशाची सूत्रे पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हातात द्यायचे लोकांनी ठरविले आहे. देशातील समान्य माणसाच्या मनात खात्री आहे की, या देशाला फक्त नरेंद्र मोदी विकसीत करु शकतात. मात्र, मोदींचे नाव आहे म्हणून अतिआत्मविश्वासात गाफील राहू नका. अशा भावनेत गेला तर मोदीजी मेहनत करतात, त्याला साजेसे आपले काम होणार नाही. यासाठी प्रत्येकाला पुढचे ९ ते १० महिने पक्षासाठी द्यावे लागतील.
दोन्ही निवडणुका तिन्ही पक्ष एकत्रपणे लढतील. कुणाला किती जागा मिळतील. याची काळजी करु नका. तुमच्या मनात आहेत तेवढ्या जागा आपल्याला मिळणारच आहेत. त्यापेक्षा कमी मिळणार नाहीत. ज्या जागा आपण लढत नाही, तिथे जो निवडून येईल तो देखील मोदींना पाठिंबा देईल, असे फडणवीस यावेळी आवर्जुन म्हणाले.
हेही वाचा :