Latest

Nagpur Blast: नागपुरमधील कंपनीत स्फोट; ९ कामगारांचा होरपळून मृत्यू

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव येथील कंपनीत झालेल्या स्फोटात ९ कामगारांचा मृत्यू झाला. तर तीन कामगार जखमी झाले आहेत. नागपूर अमरावती रोडवरील बाजारगाव येथील कंपनीत आज (दि.१७) सकाळी ही आगीची दुर्घटना घडली. ही कंपनी भारतीय लष्करासाठी ड्रोन आणि स्फोटके तयार करते, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून दिलेल्या माहितीत म्हटले आहेत. तसेच दरम्यान या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. अशी माहिती पोलीसांनी दिल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे.  (Nagpur Blast)

नागपुरातील बाजारगाव गावातील सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीत हा स्फोट झाला. सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीतील कास्ट बूस्टर प्लांटमध्ये पॅकिंगच्या वेळी हा स्फोट झाला. यामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती नागपूरचे एसपी हर्ष पोद्दार यांनी एएनआयशी बोलताना दिले आहे.

मृत कामगारांच्‍या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर

या दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या 'X' खात्यावर पोस्ट केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "नागपुरातील सोलार इंडस्ट्रीजमध्ये झालेल्या स्फोटात 6 महिलांसह 9 कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे आहे. संरक्षण दलासाठी ड्रोन आणि स्फोटके तयार करणारी ही कंपनी आहे. नागपूर जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्याशी सातत्याने संपर्कात असून स्वतः पाेलीस महानिरीक्षक, पाेलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी घटनास्थळी आहेत. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना ५ लाख रुपयांची मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल. त्याला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी मान्यता दिली आहे."

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT