Latest

नागालँड विधानसभेसाठी आज मतदान, १८३ उमेदवारांपैकी केवळ चार महिला रिंगणात

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन: नागालँडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी आज (दि.२७) मतदान होत आहे.  ६० मतदारसंघात एकूण १८३ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. राज्यात जवळपास सर्वच सामाजिक प्रश्नांवर महिला नेतृत्वाच्या भूमिकेत आहेत. परंतु या विधानसभा निवडणूकीत एकही महिला आमदार नसलेल्या नागालँडमध्ये केवळ चारच महिला निवडणूक रिंगणात असल्याचे चित्र आहे.  ईशान्येकडील राज्यातील पहिल्या महिला आमदार बनून इतिहास घडविण्‍याची त्‍यांना संधी आहे. चार महिलांसह आज १८३ उमेदवारांचे  भवितव्य मतपेटीत कैद होणार आहे.

नागालँडमध्ये एकूण 13,17,632 मतदार आहेत, त्यापैकी महिला मतदारांची संख्या 6,56,143 म्हणजेच 49.8 टक्के आहे. राज्यात एकूण 183 उमेदवार रिंगणात असून त्यापैकी चार महिला आहेत.  निवडणूक निकाल २ मार्चला जाहीर होणार असून, नागालँडला पहिली महिला आमदार मिळणार का? यासाठी आणखी दोन दिवस वाट पाहावी लागणार आहे.

नागालँड राज्यातील १३ लाखांहून अधिक मतदार चार महिला उमेदवारांसह एकूण १८३ उमेदवारांचे भवितव्य आज ठरवणार आहे. येथे एकूण ६० जागा आहेत, मात्र यावेळी ५९ जागांवर मतदान होत आहे.  १९ अपक्षांसह १८४ उमेदवार रिंगणात आहेत. नागालँडचे पोलीस महासंचालक रुपिन शर्मा यांनी सांगितले की, नागालँडच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. सुरक्षेसाठी पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे. केंद्रीय सशस्त्र पोलिस दल आणि राज्य सशस्त्र पोलिस दलाच्या ३०५ कंपन्या आणि नागालँड पोलिसांच्या १५ बटालियनही तैनात करण्यात आल्या आहेत.

नागालँडला पहिली महिला आमदार मिळणार का?

नागालँड राज्य स्‍थापन होवून ६० वर्षे झाली आहेत, मात्र आजपर्यंत राज्यात महिला आमदार नाही. यावेळी भाजपने एक, एनडीपीपीने दोन आणि काँग्रेसच्‍या वतीने एक महिला उमेदवार रिंगणात आहे. या उमेदवारांमध्ये दिमापूर मतदारसंघासाठी 3 जागेवरून राष्ट्रवादी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीच्या (NDPP) हेखनी जाखलू, टेनिंग मतदारसंघातून0 काँग्रेसच्या रोझी थॉम्पसन, पश्चिम अंगामी विधानसभा मतदारसंघातून NDPP च्या सलहौतुओनुओ आणि अटोइजू मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) काहुली सेमा या रिंगणात आहेत.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT