Latest

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ‘पहिल्या राष्ट्रीय प्रशिक्षण संमेलानाचे’ उद्घाटन

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रविवारी सकाळी साडे दहा वाजता पहिल्या राष्ट्रीय प्रशिक्षण संमेलनाचे उद्घाटन करणार आहेत. दिल्लीतील प्रगती मैदानाच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि सम्मेलन केंद्रात राष्ट्रीय प्रशिक्षण सम्मेलन भरवण्यात आले आहे. या वेळी ते कार्यक्रमाला संबोधित करतील. पीएम नॅशनल ट्रेनिंग कॉन्क्लेव्हचा उद्देश नागरी सेवा प्रशिक्षण संस्थांमधील समन्वय सुधारणे, प्रशिक्षण पायाभूत सुविधांचा अधिक चांगला वापर करणे हा आहे.

देशभरातील प्रशासकीय सेवा प्रशिक्षण संस्थांमधील सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण पायाभूत सुविधा मजबूत करण्याच्या उद्देशाने क्षमता निर्माण आयोगाद्वारे राष्ट्रीय प्रशिक्षण परिषद आयोजित केली जात आहे.
केंद्रीय प्रशिक्षण संस्था, राज्य प्रशासकीय प्रशिक्षण संस्था आणि संशोधन संस्थांसह प्रशिक्षण संस्थांमधील १५०० हून अधिक प्रतिनिधी परिषदेत सहभागी होणार आहेत. केंद्र सरकारचे विभाग, राज्य सरकारे, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रशासकीय अधिकारी तसेच खाजगी क्षेत्रातील तज्ज्ञ या चर्चेत सहभागी होतील.

कॉन्क्लेव्ह विचारांच्या देवाणघेवाणीला चालना देईल, भेडसावणारी आव्हाने आणि उपलब्ध संधी ओळखेल आणि कृती करण्यायोग्य उपाय शोधून काढेल आणि क्षमता वाढीसाठी सर्वसमावेशक धोरणे तयार करेल.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT