Latest

प. बंगालमध्‍ये ‘तृणमूल’च्‍या कार्यालयवर ‘बुलडोझर;! अतिक्रमणाविरोधात प्रशासनाची कारवाई

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्हा प्रशासनाने सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे (Trinamool Congress) बेकायदेशीर कार्यालय बुलडोझरने पाडले. कोलकाता उच्च न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला टीएमसी पक्ष कार्यालय उद्ध्वस्त करण्याचा आदेश दिले होते. त्‍यानुसार ही कारवाई करण्‍यात आल्‍याचे जिल्‍हा प्रशासनाने स्‍पष्‍ट केले आहे. बुलडोझरच्या साहाय्याने टीएमसीचे पक्ष कार्यालय उद्ध्वस्त करण्याची पश्चिम बंगालमधील ही बहुधा पहिलीच वेळ आहे.

कोलकाता उच्च न्यायालयाने नुकतेच जिल्हा प्रशासनाला टीएमसी पक्षाचे कार्यालय पाडण्याचे आदेश दिले होते. या आदेशाचे पालन करत मुर्शिदाबाद जिल्हाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने पोलिस अधिकारी कार्यालय असलेल्या बारवा येथे पोहोचले. तृणमूलचे अतिक्रमण केलेले कार्यालयाने जेसीबीच्‍या सहाय्‍याने पाडण्याचे आदेश दिले. यावेळी काही टीएमसी कार्यकर्ते घटनास्थळी आले. त्यांनी अधिकाऱ्यांना पक्ष कार्यालय न पाडण्याची विनंती केली. मात्र, जिल्हा प्रशासनाने न्‍यायालयाच्‍या आदेशाचे पालन करत तृणमूलचे बेकायदा कार्यालय जमीनदोस्त केले.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT