तुळजापूर, पुढारी वृत्तसेवा : शारदीय नवरात्र महोत्सवात शुक्रवारी पाचव्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीची मुरली अलंकार महापूजा करण्यात आली. श्री तुळजाभवानी देवीचे हे रुप अत्यंत मनमोहक आहे.
श्री तुळजाभवानीची आज नित्योपचार पूजा आणि अभिषेक पूजेनंतर मुरली अलंकार महापूजा मांडण्यात आली. चौथ्या माळेपासून विविध अलंकार रुपातील श्री देवीजींची पूजा मांडण्यात आली. दररोज नियमित श्री तुळजाभवानी देवीचे विविध धार्मिक विधी विधीवत पार पाडले जातात. उद्या शेषशाही अलंकार महापूजा मांडली जाणार आहे.
तत्पूर्वी, गुरुवारी रात्री 10 वाजता श्री तुळजाभवानी देवीची छबिना मिरवणूक काढण्यात आली. चौथ्या माळेच्या दिवशी अभिषेक पूजेनंतर देवीला वस्त्र अलंकार चढविण्यात आला. त्यानंतर धूप आरती करण्यात आली. रात्री श्री तुळजाभवानी मंदिरात मोर वाहनावरून छबिना मिरवणूक काढण्यात आली. भाविकांची गर्दी वाढली असल्याने तुळजापूर गजबजून गेले आहे.
हेही वाचा