Latest

Munawar Faruqui-Hina Khan चा रोमान्स, Youtube येताच तुफान व्हायरल

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुनावर फारुकी आणि हिना खान के रोमँटिक ट्रॅक तुफान व्हायरल होताना दिसत आहे. हिनाच्या चेहऱ्यावर हलके हलके हास्य आणि भर पावसात रोमँटिक गाणं, अशी त्यांची केमिस्ट्री जुळली आहे. (Munawar Faruqui-Hina Khan ) गाणे युट्यूबवर येताच धुमाकूळ घातले आहे. काही तासांमध्येच या गाण्याला लाखो व्ह्युव्ज मिळत आहेत. (Munawar Faruqui-Hina Khan )

संबंधित बातम्या –

मुनव्वर फारुकी आणि हिना यांचे रोमँटिक ट्रॅकचे पोस्टर देखील तितकेच सुंदर आहे. हिना खान – बिग बॉस १७ विनर मुनव्वर फारुकीचे गाणे 'हल्की-हल्की सी' फॅन्सच्या पसंतीस उतरत आहे. या गाण्यांचे लिरिक्स तुम्हाला नक्कीच लक्षात राहिल. ४ मिनिटे ५९ सेकंदाचे हे गाणे आणखी रोमँटिकपणे तयार करण्यात आले आहे. मुनव्वर फारुकीचे हे गाणे शायराना अंदाजात असीस कौर आणि साज भट्ट यांनी आपल्या सुंदर आवाजात गायले आहे. गाण्याचे लिरिक्स संजीव चतुर्वेदीने लिहिले आहेत.

Youtube वर येताच गाण्याचा धुमाकूळ

मुनव्वर फारुकी आणि हिना खानचे गाणे 'हल्की-हल्की सी'ने संगीतप्रेमांच्या मनावर रुंजी घातलीय. मुनव्वर-हिनाने या गाण्याचे शूटिंग कोलकातामध्ये केली होती. यातील काही स्टिल्स देखील व्हायरल झाले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT