Latest

Mumbai Temperature : मुंबईत थंडीचा जोर वाढला; तापमान १९.५ अंशावर

Sonali Jadhav

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून किमान तापमान हळूहळू कमी होऊन थंडीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे मुंबईकरांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे. शनिवारी सांताक्रूझ आणि कुलाबा येथील किमान तापमान अनुक्रमे १९.५ अंश आणि २०.८ अंश नोंदवण्यात आले. देशाच्या उत्तरेकडील भागात हिमवर्षाव आणि थंडी वाढत असून येथील शीत वाऱ्यांच्या प्रभावामुळे मुंबईसह राज्यात थंडीचा जोर वाढला आहे.(Mumbai Temperature)

Mumbai Temperature : थंडीचा प्रभाव आणखी वाढण्याची शक्यता

येत्या दोन दिवसांत तापमान पुन्हा कमी होण्याची शक्यता असून किमान तापमान १४ ते १६ अंशांदरम्यान राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला. सायंकाळी ५ वाजल्यापासून थंडी वाढण्यास सुरू होते. समुद्रकिनारी असलेल्या दादर, मरिन लाईन्स, चर्चगेट, जुहू या विभागात थंडीचा जोर सर्वाधिक आहे. परिणामी थंडीमुळे गेल्या तीन दिवसांपासून गार्डनमध्ये जॉगिंग करणाऱ्यांची संख्याही कमी झाली आहे. कल्याण-डोंबिवलीत १०, तर बदलापूरमध्ये सर्वांत कमी ८.८ अंश तापमानाची नोंद कल्याण-डोंबिवलीकरांसाठी रविवारची सकाळ चांगलीच गारेगार ठरली. यंदाच्या मोसमातील सर्वांत कमी तापमानाची नोंद झाली आहे. कल्याणात तब्बल १०.७ अंश सेल्सिअस, तर डोंबिवलीत ११.५ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT