Latest

Mumbai Police received hoax call | मुंबईत दहशतवादी घुसल्याची खोटी माहिती देणाऱ्यास ATS कडून अटक

दीपक दि. भांदिगरे

मुंबई; पुढारी ऑनलाईन : पाकिस्तानशी संबंधित तीन दहशतवादी मुंबईत आल्याची खोटी माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला देणाऱ्या यासीन सय्यद नावाच्या व्यक्तीला महाराष्ट्र एटीएसने अटक केली. त्याला पुढील तपासासाठी आझाद मैदान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले आहे. (Mumbai Police received hoax call)

मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला एक फोन कॉल आला होता. त्यावरुन दुबईहून पाकिस्तानशी संबंध असलेले तीन दहशतवादी मुंबईत आल्याची दिली होती. पण पोलिसांनी केलेल्या तपासात आढळून आले की हा एक खोटा कॉल होता. या प्रकरणी आझाद मैदान पोलीस स्थानकात आयपीसीच्या ५०५(१), ५०५(२) नुसार गुन्हा दाखल केला होता.

मुंबईमध्ये तीन अतिरेकी घुसले असून त्यांचा संबंध पाकिस्तानशी असल्याचा दावा करणारा एक कॉल मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षात आल्याने पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली होती. मुंबई पोलिसांनी या कॉलची दखल घेत मुंबईत हाय अलर्ट जारी करत शहरातील बंदोबस्तात वाढ केली होती. तसेच या कॉलची माहिती राज्यातील आणि केंद्रातील गुप्तचर व तपास यंत्रणांना देत पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी केलेल्या तपासात हा खोटा कॉल असल्याचे स्पष्ट झाले असून कॉल करणार्‍याविरोधात आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कॉलरचा शोध घेऊन त्याला जेरबंद करण्यात आले आहे.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT