पुढारी ऑनलाईन : मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना नोटीस बजावून कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा आणू नये, असा इशारा दिला आहे. दरम्यान, दक्षिण मुंबईत खोके दिन साजरा करण्याच्या तयारीत असलेल्या ठाकरे गटाच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी आज ताब्यात घेतले.
ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखांसह काही नगरसेवकांना पोलिसांनी नोटीस बजावण्यात आली आहे. नागपाडा परिसरात कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून गद्दार निषेध दिन आंदोलन करण्यात आले. पन्नास खोके, एकदम ओके असे फलक यावेळी झळकले.
गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत भाजपला सोबत घेऊन सरकार स्थापन केले. त्यांनी गेल्या वर्षी २० जून २०२२ रोजी ठाकरेंची साथ सोडली. यामुळे २० जून हा जागतिक गद्दार दिन म्हणून जाहीर करावा, अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. याबाबत त्यांनी संयुक्त राष्ट्र संघाला (UN) एक पत्र लिहिले आहे.
गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली ४० आमदारांनी बंडखोरी केल्याने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडले होते. शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाने काल एकाच दिवशी म्हणजेच १९ जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन वेगवेगळा साजरा केला. याचदरम्यान राऊत यांनी २० जून गद्दार दिन जाहीर करण्याची मागणी केली आहे.
हे ही वाचा :