Latest

Mumbai Model Alleges : मुंबईतील मॉडेलवर अत्याचार करत धर्मपरिवर्तनासाठी दबाव

अमृता चौगुले

मुंबई; पुढारी ऑनलाईन :  येथील मॉडेलने रांचीमधील मॉडेल एजन्सीच्या मालकावर बलात्कार, खंडणी आणि जबरदस्तीने धर्मपरिवर्तन करायला लावल्याचा आरोप केला आहे. पीडित मॉडेलने मुंबईतील वर्सोवा पोलिस ठाण्यात झारखंडची राजधानी रांची येथील रहिवासी तन्वीर अख्तर मोहम्मद लेक खान (Tanveer Akhtar Khan) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मॉडेल ही बिहारच्या भागलपूर येथील रहिवासी आहे. (Mumbai Model Alleges)

बिहारची रहिवासी असलेली पीडित मॉडेल (Manvi raj singh) झारखंडमधील रांची येथे मॉडेलिंग शिकण्यासाठी आली होती. जेणेकरून तिला स्वत:ला मॉडेलिंगमध्ये ग्रूम करायचे आणि एक उत्तम मॉडेल म्हणून तयारी करायची होती. पण पुढे जाऊन तिचे काय होणार आहे हे तिला माहीत नव्हते. तिने रांचीमधील एका मॉडेलिंग ग्रूमिंग इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला. या संस्थेच्या मालकाने पीडितेला पाहिले तेव्हा त्याला ती खूप आवडली. दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. पण संस्थेच्या मालकाच्या मनात काहीतरी वेगळंच चालू होतं. मैत्रीचे हे नाते अजून वाढावे असे त्याला वाटत होते. (Mumbai Model Alleges)

इन्स्टिट्युट मालकाला पीडितेसोबत लग्न करायचे होते. त्यासाठी त्याने पीडितेला प्रपोज केले. तेव्हाच तिला कळले की ती ज्याला मित्र मानत आहे, ती व्यक्ती तिच्याशी खोटे बोलली आहे. वास्तविक, संस्थेच्या मालकाने त्याचे नाव यश असे सांगितले. त्याचं खरं नाव तनवीर अख्तर खान आहे. हा सर्व प्रकार पीडितेला कळल्यावर तिनेही त्याच्याशी असलेली मैत्री तोडली. (Mumbai Model Alleges)

तनवीरला ही गोष्ट आवडली नाही. आता तो तिच्यासोबत लग्न करून धर्म बदलण्यासाठी अधिक दबाव टाकू लागला. पण पीडितेने त्याचा आधीच तिरस्कार केला होता. त्यामुळेच तिने तन्वीरचा प्रस्ताव नाकारला. त्यानंतर प्रकरण आरोप-प्रत्यारोपापर्यंत पोहोचले. तन्वीर पीडितेला ब्लॅकमेल करू लागला. वास्तविक, त्याच्याकडे पीडितेचे काही खासगी फोटो होते. ते व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने पीडितेवर लग्नासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली.

तन्वीरलाला कंटाळून पीडितेने रांची शहर सोडले. ती मुंबईला शिफ्ट झाली. पण एकतर्फी प्रेमात वेडा झालेला तन्वीरने इथेही तिचा पाठलाग सोडला नाही. तो तिला धमक्या देत राहिला. नाराज झाल्यानंतर पीडितेने वर्सोवा पोलिस ठाण्यात तन्वीरविरुद्ध गुन्हा दाखल केला.

पीडितेने पोलिसांना सांगितले की, मैत्रीदरम्यान तन्वीरने तिला होळीच्या दिवशी गोळ्या खाऊ घातल्यानंतर तिचे काही फोटो काढले. यानंतर तन्वीरने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली आणि भांडणाचा प्रकारही सुरू झाला. आरोपी तन्वीरने तिच्यावर धर्म बदलून लग्न करण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. वैतागून ती मुंबईत आली. मात्र त्यानंतरही तो तिला ब्लॅकमेल करत होता.

तन्वीरने मान्य केली चूक

जेव्हा हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले तेव्हा तन्वीरने आपली चूक मान्य केली आणि पीडितेला एफआयआर मागे घेण्यास सांगितले. तन्वीर खानने कोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात कबूल केले की तो तिला त्रास देत असे. मात्र, तिचा कोणत्याही प्रकारे इजा करण्याचा त्याचा हेतू नव्हता.

दोघांना एकत्र राहता यावे, यासाठी दबाव निर्माण करण्यासाठी तो असे करायचा. याशिवाय भविष्यात असे काही करणार नाही, अशी कबुलीही त्यांनी याच प्रतिज्ञापत्रात दिली आहे. पण, त्यानंतरही तो असे प्रकार करत आहे.

मुंबई पोलिसांकडून रांची पोलिसांकडे प्रकरण वर्ग

पीडितेने तिच्या ट्विटर हँडलवर व्हिडिओ अपलोड करून झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना संरक्षणाची विनंती केली आहे. पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत. तपासाच्या आधारेच पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. हे प्रकरण मुंबईहून रांची येथे वर्ग करण्यात आले आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही.

तन्वीर म्हणाला – सर्व आरोप चुकीचे आहेत

त्याचवेळी तन्वीरने या संपूर्ण प्रकरणावर वेगळीच गोष्ट सांगितली आहे. आपल्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप चुकीचे असल्याचे त्यांने सांगितले. तो म्हणाला, "मानवी माझ्यासोबत काम करायची. दरम्यान, मानवीमुळे माझ्या व्यवसायाचे नुकसान झाले, त्यामुळे मी तिच्याकडे भरपाई मागितली. तेव्हापासून ती मला खोट्या प्रकरणात अडकवण्यासाठी ब्लॅकमेल करत आहे. तिच्याकडे माझे काही खाजगी फोटोही आहेत, जे तिने माझ्या ओळखीच्या लोकांना पाठवले आहेत.

तन्वीरने सांगितले की, असे असूनही मी तिच्याविरुद्ध कोणतीही पोलिस तक्रार केली नाही. मानवीचा प्रियकर रवज्योत सिंग आणि त्याचा मित्रही माझ्या मोबाईलमधील डेटा चोरून मला ब्लॅकमेल करायचे.


अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT